अमित गुरव – : भादवण या गावात अविश्वास ठराव आणला आणि हळूहळू वातावरण तापू लागले. २ मार्च रोजी संजय पाटील समर्थक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेत त्यांनी आम्ही ही निवडणूक खंड पडलेला विकास घडवून आणण्यासाठी लावली असल्याचे ग्रामस्थांना संबोधित केले. तसेच सरपंच माधुरी गाडे यांनी मनमानी कारभार सुरु केला असा आरोप करत आपली तोफ डागाळली. आपल्या कार्यकाळात महिन्याला किमान एक नारळ फुटत होता विकासाची गंगा वाहत होती पण गाडे यांनी गट तट करत सरपंच पदाची धुरा सांभाळली. माझे कार्यकर्ते तेव्हाच सांगत होते की , ही उमेदवारी बदला पण तेव्हा मी ऐकले नाही ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
हरीश दिवेकर यांनी पाटील यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक करतानाच सरपंच माधुरी गाडे यांनी सहकारी वर्गाशी दोन वर्षात कधीही संवाद दिसला नाही. भिवा जाधव यांनी ही तिन्ही मंडळी स्वार्था साठी नसून गावच्या विकासासाठी एकत्र आली आहेत असल्याचे सांगितले. याप्रसंगी पी. के. केसरकर, डि. जे. शिवगंड यांची भाषणे झाली.


३ मार्च रोजी सरपंच माधुरी गाडे यांच्या समर्थकांनी जाहीर सभा घेतली त्यात गाडे यांनी मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही आणि तुम्ही ही घाबरू नका असे जनतेला थेट आवाहन करत. ही वाघीण आता तुमचे राजकारण संपवले शिवाय शांत राहणार नाही असाच इशाराच नाव न घेता भूतकाळातील आपल्या गट नेत्यांवर केला. मी सह्या करत नाही या आरोपाचे खंडन करताना त्यांनी ग्रामस्थांना त्रास होईल अशा कोणत्याही कागदपत्रावर किंवा कोऱ्या चेक वर सही करणार नसल्याचे स्पष्ट केले.
डॉ.केसरकर यांचे मते आमची गेलेली २ गाढव पुन्हा आमच्याकडे येतील पण वेळ निघून गेली असल्याचे सांगत त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद झाल्याची जाणीव करून दिली. संजय केसरकर यांनी गेलेल्या लोकांनी त्यांना मदत कोणी केली आणि गोत्यात कोणी आणले यांचा विचार करायला हवा होता असा अप्रत्यक्ष संदेश दिला. युवराज पोवार यांनी गाडे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना कोणतीही मदत लागली तर शिवसेना तुमच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.
एकंदरीत गाडे समर्थक आणि विरोधक यांनी आपली भूमिका जनतेसमोर मांडली आहे. आता ५ मार्च रोजी जनता कोणाला मताचा कौल देणार आणि कोण ग्रामपंचायत मध्ये गुलाल उधळणार हे समजेलच

मुख्यसंपादक



