Homeघडामोडीजम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्याचा आजऱ्यातील मुस्लिम समाजाने केला...

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्याचा आजऱ्यातील मुस्लिम समाजाने केला निषेध

आजरा (हसन तकीलदार ):-जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बेछुट गोळीबार करून निरापराध लोकांची हत्त्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानचा आजरा येथे मुस्लिम समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तर मुक्ती संघर्ष समितीतर्फे मेणबत्त्या पेटवून मृत्युमुखी पडलेल्या भारतीयासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तिव्र निषेध करीत शुक्रवारच्या नमाज पठणानंतर आजऱ्यातील सर्व मशिदिंसमोर मुस्लिम बांधव एकत्र येत दंडाला काळ्या फिती बांधून “पाकिस्तान मुर्दाबाद “, दहशतवादी मुर्दाबादच्या घोषणा देत या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शांत असलेल्या काश्मीरला परत रक्त रंजित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. तर मुक्ती संघर्ष समितीने सुरु असलेल्या आपल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मेणबत्त्या पेटवून दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉ. संग्राम सावंत म्हणाले की, भारतातल्या नागरिकांवर जो भ्याड हल्ला केला गेला आहे असा भ्याड आणि अमानवीय हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात, दहशतवाद्यांच्या विरोधात मुक्ती संघर्ष समिती आणि समस्त भारत नगर वासीय तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, युनूस सैय्यद, सलाउद्दीन शेख, मौजुद माणगावकर, जमील निशानदार, तौफिक माणगावकर, रशीद लाडजी, म्हमदू नसरदी, सलीम नाईकवाडे, महंमदरसूल तगारे, यासिन सैय्यद, पापा लतीफ, मुखतार काकतिकर, वासिम गणेशवाडी आदिजण उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular