आजरा (हसन तकीलदार ) :-येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा या प्रशालेत गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती उत्साहात संपन्न झाली
.यावेळी छ.शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे शुभहस्ते करण्यात आले.. यावेळी सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील, संचालक पांडुरंग जाधव, सचिन शिंपी , सुधाकर जाधव, प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, ज्युनिअर कॉलेज विभाग व्यवस्थापक एम.ए. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक रणजीत देसाई, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिमा पूजानानंतर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन कार्य या विषयावर डी. आर. पाटील यांनी आपले विचार मांडले यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मापासून ते कोल्हापूरच्या राजगादीवर विराजमान झाल्यानंतर लोक हितकारी निर्णय घेत विविध योजना राबविल्या, वाडी वस्तीतील झोपडपट्टीतील लोकांपर्यंत स्वतः जाऊन त्यांच्या शेतांच्या बांधावर फेरफटका मारून त्यांच्याबरोबर त्यांची कांदा भाकर खाणारा राजा हा खऱ्या अर्थाने लोकराजा होता. जनतेतील गोरगरीब दीनदलित तसेच विविध जाती धर्मातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वस्तीगृहे उभारली, राधानगरी धरण निर्मिती, आरक्षण पद्धत, अस्पृश्यता निवारण इत्यादी लोकहितवादी निर्णयामुळे लोककल्याणकारी राजा म्हणून सर्वत्र ख्याती लाभलेले तसेच राजर्षी किताब लाभलेले छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर जन माणसांच्या हृदयसिंहासनावर आरुढ होत लोकप्रियता मिळवलेले राजे होत.. .त्यानंतर व्ही.टी. कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्यावर स्वरचित शाहिरी पोवाडा म्हणून अभिवादन केले . अध्यक्षीय भाषणात जयवंतराव शिंपी यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण, सामाजिक कार्य कसे होते व त्यांनी समाजातल्या दीन- दलित कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि विशिष्ट नियमावलीही आखली . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणावरही त्यांनी खर्च करून त्यांना प्रोत्साहन दिले. म्हणून मुलांनी वाचलं पाहिजे शिक्षण घेतले पाहिजे थोरा मोठ्यांचं जीवन कार्य अभ्यासलं पाहिजे. शिक्षणानेच माणसाचा उद्धार होतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.व्ही. पाटील व आभार व्ही.एच गवारी यांनी केले.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



