गारगोटी (हसन तकीलदार) -: भुदरगड तालुक्यातील दोनवडे-नितवडे-खेडगे-एरंडपे येथील सात धबधबे सुशोभिकरण व विकसीत करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 3 कोटी 44 लाख रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण समारंभ नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच वर्षाविहारासह जंगल, जल, जमीन, शेती पाहण्याची जणू सुवर्ण संधीच मिळत आहे.
सवतकडा धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे. निसर्गाचा मनमोहक अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून, या परिसराच्या विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत.
सवतकडा धबधब्याचा विकास ही निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकास यामधील एक सकारात्मक पाऊल असून, वनविभाग, स्थानिक ग्रामस्थ, आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे ठिकाण लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येणार आहे. येथील निसर्ग आणि धबधबे जणू पर्यटकांनाखूणवत असल्याचा भास वाटतो. गारगोटी कडगाव मार्गावरील हा निसर्गरम्य परिसर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथून येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. पालमंत्री व आरोग्यमंत्री नाम. आबिटकर यांच्या सतच्या पापुराव्यामुळे ही योजना प्रत्यक्षात आली असून भविष्यातील पर्यटनासाठीहा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.


यावेळी के.जी.नांदेकर(कोकण केसरी), धैर्यशील पाटील(कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक), कल्याणराव निकम, बाबा नांदेकर, संदीप वरंडेकर, संग्रामसिंह सावंत(शिवसेना तालुका प्रमुख), किर्तीताई देसाई(माजी सभापती), मानसिंग पाटील, विलास काळे(सहाय्य्क वनसंरक्षक), अविनाश तायनाक(वनक्षेत्रपाल गारगोटी), विद्याधर परीट (युवासेना तालुकाप्रमुख )यांच्यासह प्रमुख मान्यवर, संबंधित गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व नागरीक उपस्थित होते.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



