आजरा (हसन तकीलदार):-सरपंच परिषद मुंबई तर्फे पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून काम सुरु आहे.या उपक्रमामध्ये प्रामुख्याने वणवा निर्मूलन मोहीम महत्वाची ठरली आहे. त्यालाच अनुसरून आता जंगल संवर्धनासाठी सरपंच परिषदेने गावगावच्या परिसरामध्ये देशी प्रजातीची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी देशी प्रजातीची 50रोपे प्रत्येक ग्रामपंचायतीस विनामूल्य देण्याचे धोरण सरपंच परिषदेने ठरविले असून संबंधित ग्रामपंचायतिनेही स्वतः 50रोपे घालून अशी शतकी देशी प्रजातीची रोपे प्रत्येक गावात लावायचा संकल्प केला आहे. ग्लोबल वर्मिंग आणि सिमेंटच्या जंगलामुळे नष्ट होत चाललेली देशी प्रजातीच्या निसर्गसंपदेला पुनर्जीवन देण्याचा हा संकल्प निसर्गाला सावरण्यासाठी हातभार लावण्याचे काम करणार आहे.
सरपंच परिषदेच्या वणवा निर्मूलन उपक्रमामध्ये जंगलातील वणवे रोखण्यासाठी वन विभागाला खूप चांगल्या प्रकारे यश येताना दिसत आहे. त्यामुळे जळीत होणाऱ्या जंगलातील कित्येक प्रमाणात घट झालेल्या झाडे, वेली याचबरोबर पशु, पक्षी, कीटक वन्यप्राणी व असंख्य जीवजंतू यांना वाचवण्यासाठी मोलाचे वाटेकरी झाली आहे.वन विभागाच्या संबंधित असलेल्या वनअग्नी पोर्टल निष्कर्षांमध्येही याची नोंद होत आहे. आता याला अनुसरूनच आजरा तालुक्यात असणाऱ्या समृद्ध जंगल क्षेत्रामध्ये वृद्धी व्हावी, निसर्गाचे समतोल रहावे तसेच विकासाच्या नावावर अमाप झालेली वृक्षतोडीची भरपाई होण्याचा उद्देशाने गावगावच्या परिसरामध्ये देशी प्रजातीची झाडे लावणेचा संकल्प सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र )ने हाती घेतला आहे. त्यासाठी देशी प्रजातीची 50रोपे प्रत्येक ग्रामपंचायतीस विनामूल्य देत त्याच्या जोडीला ग्रामपंचायतीने स्वतः आणखीन 50 रोपे घालून अशी शतकी देशी प्रजातीची झाडे प्रत्येक गावामध्ये लावण्याचा संकल्प सरपंच परिषदेने केला आहे. त्याचबरोबर वाढदिवस, आई वडील यांचे समरणार्थ झाडे लावली जावीत हा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील (इंजिनियर)यांनी सांगितले. स्मशानभूमी परिसर, गायरानातील क्षेत्र, किंवा जंगल क्षेत्र त्याचबरोबर पाणंद रस्त्याच्या दुतर्फा जागी वृक्ष लागवडीसाठी निवडावीत व रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही संबंधित ग्रामपंचायत स्तरावर व्हावी अशा रीतीने या हंगामात दहा हजार देशी प्रजातीची झाडे लावण्याचा संकल्प सरपंच परिषदेने हाती घेतला असलेबाबतही पाटील यांनी सांगितले.

यावेळी पांडुरंग तोरगल्ले, प्रियांका जाधव, युवराज पाटील, समीक्षा देसाई, विलास जोशीलकर, लहू वास्कर, राजू पोतनीस, अनिल पाटील, धनाजी देसाई, रत्नप्रभा भुतुर्ले, पांडुरंग खवरे, वैषाली गुरव, चंद्रकांत गुरव आदिजण उपस्थित होते.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक


