Homeघडामोडीकालेकर कुटुंबाला "रवळनाथा"ने दिला मदतीचा हात

कालेकर कुटुंबाला “रवळनाथा”ने दिला मदतीचा हात

आजरा (हसन तकीलदार):-पेरणोली ता. आजरा येथील मच्छिन्द्र नारायण कालेकर यांचे आकस्मिक निधन झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची व नाजूक असणाऱ्या कालेकर कुटुंबियांवर जणू दुःखाचे डोंगरच कोसळले त्यामुळे कालेकर कुटुंबियांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली या संदर्भात माहिती घेऊन श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कालेकर कुटुंबियांची चौकशी केली आणि रुपये पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड ऍम्बेसिडर माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमांतर्गत रवळनाथ तर्फे ही मदत देण्यात आली.


मच्छिन्द्र कालेकर हे भूमिहीन शेतमजूर असल्यामुळे गावी शेतमजूरी आणि पशुपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. झोपडीवजा घरात राहणारा त्यांचा आई, पत्नी, मुलगा आणि विवाहीत मुलगी असा परिवार आहे. गेल्या दोन महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी घरातील पशुधनाचीदेखील कुटुंबियांना विक्री करावी लागली. त्यामुळे कालेकर कुटुंबीय सर्वबाजूनी आर्थिक संकटात सापडले आहे.
रवळनाथ तर्फे नेहमीच समाजातील अपघातग्रस्त, जळीतग्रस्त, गरीब आणि संकटात सापडलेल्या दुर्बल घटकासाठी सहकार्य केले जाते. अशा प्रसंगी माणुसकीच्या नात्याने हतबल होणाऱ्या बांधवाना धीर देण्याचे आणि मायेची उब देण्याचे काम नेहमीच रवळनाथकडून केले जाते. रवळनाथाच्या या मदतीबद्दल कालेकर कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. रवळनाथचे संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी देखील वैयक्तिक रुपये अकरा हजारांची आर्थिक मदत दिली.


याप्रसंगी संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, सी.इ.ओ. डी. के. मायदेव यांच्यासह सरपंच सौ. प्रियांका जाधव, कारखाना संचालक उदयराज पवार, वसंत तारळेकर, टी. एस. गडकरी, ग्रामपंचायत सदस्या सुनीता कालेकर, पत्रकार रणजित कालेकर, कालेकर कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.
लिंक मराठी तर्फे दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात येत आहे की, माणुसकी जपत पुढाकार घेऊन कालेकर कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हातभार लावावा.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

You Tube लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular