आजरा (हसन तकीलदार):-गोकुळ अष्टमी निमित्य आजऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमासह भव्य दहीहंडीचे आयोजन केले होते. यांचे हे सोळावे वर्ष. बाळ केसरकर यांच्या या मानाच्या दहीहंडीचे मानकरी ठरले ते आजऱ्याची वाघाची तालीम.
बाळ केसरकर हे स्थानिक गोविंदाना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी भव्य दहहंडी स्पर्धेचे आयोजन करतात. भव्य दिव्य अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच नेत्रदीपक प्रकाश झोतात हे कार्यक्रम पार पडले. यावर्षीही 16 व्या दही हंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाचे त्यांचे हे 16वे वर्ष. मानाच्या दहीहंडीचे अगदी नेटके नियोजन स्वराज्य तालीम मंडळाकडून करण्यात आले होते. या दहीहंडीला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. झरझर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगाला झोंबणारा गार वारा, नेत्रदीपक लाईट व्यवस्था आणि डी जे चा ठेका यामुळे एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली होती. डी जे च्या ठेक्यावर ताल धरित गोविंदा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करीत होते तर चारी बाजूनी तरुणाई थिरकत होती.

बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या सर्वच बालकलाकारांना आयोजकाकडून गौरवण्यात आले. खास आकर्षण ठरले ते सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले नारूभाई, विषल्या आणि बालाजी. या रिलस्टार सोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती. यांनीही उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले.काळजाचा ठोका चुकवणारे गोविंदांचे दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवत होते. अखेरीस वाघाची तालीम यांनी बाळ केसरकर यांच्या मानाची दहीहंडी फोडून 55,555रु. चे मानकरी ठरले. बाळ केसरकर यांच्या नेटक्या नियोजनाची चर्चा होताना दिसत होती. धो धो संततधार पावसातसुद्धा तरुणाईने आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य तालीमच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



