गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व नसून समाजाच्या आरोग्याबाबतही सजगता निर्माण करण्याची एक मोठी संधी आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, आजरा यांच्या वतीने “श्री गणेशा आरोग्याच्या आरोग्य अभियान” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत गणेशोत्सव काळात गावोगावी सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यात रक्तदाब, रक्तशर्करा, वजन, तापमान, इ. तपासण्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी करण्यात येतील. याशिवाय ईसीजी, नेत्र तपासणी यांसारख्या तपासण्यांचाही समावेश असेल.
अभियानाचे उद्दिष्ट लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, तसेच लवकर निदान करून गंभीर आजार टाळणे हे आहे. गावोगावी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली असून, या उपक्रमाला तालुक्यातील सर्वच मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
समाजाच्या आरोग्याचा विचार करून गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण करण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. धार्मिक सोहळ्याबरोबरच आरोग्याचा संदेश पोहोचवणारे हे अभियान इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरू शकेल.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



