आजरा(हसन तकीलदार):-सर्व श्रमिक संघटना व गिरणी कामगार यांनी देश पातळीवर, राजकिय दृष्ट्या जोडून घेण्या करीता, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे सभासद होऊन आजरा तालुक्यातील विविधांगी प्रश्नाची सोडुवणूक व्हावी या करीता, भाकप ( मार्क्स लेनीन व लिबरेधन )पक्षकाचे एक दिवशीय आजरा तालुका अधिवेशन किसान भवन आजरा येथे नुकतेच संपन्न झाले, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉ. शांताराम पाटिल होते. स्वागत व प्रास्ताविक नारायण भंडागे यानी केले.
प्रमुख मार्गदर्शक कॉ. अतुल दिघे यांनी म्हटले की, आजरा तालुका अधिवेशन 2025 हे भारतीय कम्यूनिष्ट पक्षाचे महाराष्ट्रातील पहिलेच अधिवेशन होतअसून, या तालुक्यातील विविधा़ंगी चळवळीचा दबदबा राज्यपातळीवर कायमचा आहे.भाकप हा गरीबांचा व राबणाऱ्या कामगारांसाठी लढणारा पक्ष आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने या तालुक्याचे विकास धोरण ठरवणे आवश्यक आहे. शासन मराठा आरक्षणात दुटप्पी भुमिका घेत असून, मराठ्यांना आरक्षण ओबिशी कोट्यातून दिले असे म्हणायचे व ओबिसीना सांगताना तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे म्हणत ओबीसी व मराठा समाजा मध्ये भांडण लावण्याचे काम हे सरकार करत आहे. जनसुरक्षा कायद्याच्या आडून शासनाची हुकमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. कॉ. शांताराम पाटील यांनी बोलताना पुढे म्हणाले की, संघटने शिवाय गोरगरीबाना न्याय मिळू शकत नाही.
गिरणीकामगाराना मुंबईत घरे मिळवण्या बरोबरच,ग्रामिण भागातील भाजी विक्रेत्याना शहरात बसण्याची जागा देत नव्हते, केवळ संघटनेमुळे प्रश्न सोडवता आला. तालुक्यातील अंगणवाडी सेवीका, जेष्ठ नागरिक, निवृत कर्मचारी पेन्शन वाढीचा प्रश्न, शेती पीकाला हमी भाव,जंगली जनावाराचा उपद्रव, वाढती महागाई आणी बेरोजगारी या विषयानुसार तालुक्यातील साधनसामुग्रीचा विचार करून, वनसंवर्धन, बारमाही हक्काचे पाणी आणी उद्योग उभारणी व शैक्षणिक सोयी सवलती साठी योग्य वाटचाल या अधिवेशनाच्या निमित्ताने पुढे घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी कॉ. काशिनाथ मोरे यांनी ठरावांचे वाचन केले. जनसुरक्षा कायदा रद्द करा. शक्तीपीठ नको कर्ज माफी करा. वनसंवर्धन करून वन्य प्राण्याचा बंदोबस्त करा. शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या. सर्वाना मोफत आरोग्य व शिक्षण द्या.
गिरणीकामगाराना मुंबईत मोफत घर द्या. गाव पातळीवरील कुटुंब व संस्कृती नष्ट करणाऱ्या टि. व्ही.मालिका बंद करा. कामगाराच्या हक्कावर गदा आणणारे कामाचे बारा तास रद़द करा. आजऱ्यात महिलाना स्वच्छतागृह बांधा. सर्व वृध्दांना नऊ हजार पेन्शन द्या. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. कंत्राटीकरण रद्द करा व सर्व मानधनी कर्मचार्याना वेतन पेन्शन व ग्र्याजूटी द्या. इत्यादी ठराव हात वर करून मांडण्यात आले. या अधिवेशन साठी निरीक्षक म्हणून कृष्णा चौगुले (राधानगरी), गोपाळ गावडे (चंदगड),दीपक दळवी (मुंबई) व सुनील बारवाडे (इचलकरंजी) हे उपस्थित होते. सुनील बारवाडे यानी यावेळी समाधान व्यक्त करीत, युवक युवतीना सामावून घेणे आवश्यक असलेचे सांगितले. यावेळी गिता पोतदार यानी महीलांचे प्रश्न व अंधश्रध्दा या विषयी मांडणी केली. सभासदाना ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी हिंदूराव कांबळे, निवृत्ती मिसाळे, रघूनाथ कातकर, महादेव होडगे, नारायण राणे, अनीता बागवे, राजेश्री कुंभार, सुधाताई कांबळे, सुमन कांबळे, नंदा वाकर, विद्या मस्कर, मनप्पा बोलके याच्यासह गिरणीकामगार व सभासद उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार कॉ.संजय घाटगे यांनी मानले.
“ताज्या मराठी घडामोडी आणि नानाविध व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच Link Marathi चॅनेल Subscribe आणि Follow करा!” 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक


