Homeघडामोडीसेवा पंधरवडा कालावधीत सर्वांनी समर्पित भावनेने सहभाग नोंदवून काम करा- तहसीलदार समीर...

सेवा पंधरवडा कालावधीत सर्वांनी समर्पित भावनेने सहभाग नोंदवून काम करा- तहसीलदार समीर माने यांचे आवाहन

आजरा (हसन तकीलदार):-महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागामार्फत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकांभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियांनांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17/09/2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.02/10/2025 या कालावधीत “सेवा पंधरवडा”राबविण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणारे कार्यक्रम हे निरंतरपणे राबविले जाणार आहेत. हे अभियान पाणंद रस्तेविषयक मोहीम योजनेच्या अंमलबजावणीसाठी पूरक उपक्रम आणि महसूल प्रशासनामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार असलेची माहिती आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.


सेवा पंधरवडा कालावधीत दि. 17/09/2025 ते 02/10/2025 या कालावधीत राबवीण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ही पुढील प्रमाणे असणार आहे. दि. 17/09/2025 रोजी ग्रामपंचायत व ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील यांच्या सहभागातून तालुक्यातील मंडळ निहाय दोन गावांची निवड करून पाणंद रस्ते दुरुस्ती, गावशिवार फेरी, गावातील रस्त्यांची यादी तयार करणे. दि. 18/09/2025 रोजी ग्रामसभा घेऊन यादी अंतिम करणे, ग्रामठरावासह यादी तहसीलदार यांना सादर करणे, अतिक्रमण रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करणे. दि. 20/09/2025 रोजी भूमिअभिलेख विभागाकडून गाव नकाशातील रस्त्याबाबत आवश्यक ठिकाणी सीमांकन करणे, तहसीलदार यांनी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत सुनावणी घेऊन आदेश पारित करणे. दि. 21/09/2025 रोजी अतिक्रमण निष्कासित करणे व रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे. दि. 22/09/2025 रोजी भूमीअभिलेख विभागाकडून दुय्यम पुनर्विलोकन नकाशात नोंदी घेणे, रस्त्यावरील विशिष्ट क्रमांक निश्चित करणे व गावातील रस्त्यांची नोंदवही अद्यावत करणे. दि. 23/09/2025 रोजी प्रत्येक मंडळ अधिकारी स्तरावर फेरफार अदालत घेऊन प्रलंबित फेरफार निर्गत करणे, भटक्या विमुक्त जातीसाठी 14प्रकारचे विशेष लाभ देणेसाठी शिबीर आयोजीत करणे. दि. 24/09/2025 रोजी प्लास्टिकमुक्ती या विषयावर निबंध स्पर्धा. दि. 25/09/2025 रोजी प्लास्टिक मुक्ती या विषयावर पथनाट्य. दि.26/09/2025 ते 29/09/2025 रोजी प्रलंबित माहिती अधिकार अर्ज निर्गती, माहिती अधिकार व सेवाहमी कायद्याबाबत माहिती देणे. दि. 30/09/2025 रोजी आपले सरकार सेवा केंद्र व तलाठी कार्यालयाचे लोकेशन गुगल नकाशावर निश्चित करणे. दि. 01/10/2025 रोजी प्रत्येक मंडळ अधिकारी स्तरावर चौकशी कामी प्राप्त प्रकरणांची निर्गती करणे. दि. 02/10/2025 रोजी फलनिष्पती व समारोप कार्यक्रम तहसील, उपविभाग व जिल्हास्तर यांचा सहभाग असेल.


सेवा पंधरवडा कालावधीत स्थानिक लोकप्रतिनिधी, आजी माजी आमदार, खासदार,आजी माजी जिल्हापरिषद सदस्य, सर्व प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, युवक यांनादेखील सहभागी करून घेणार असून आजरा तालुका संपूर्ण अभियान कालावधीत अग्रेसर राहील असे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular