Homeघडामोडीखोटे पुरावे सादर करून दुसऱ्या वॉर्डामध्ये मतदार नोंदी झाली असेल तर त्यांच्यावर...

खोटे पुरावे सादर करून दुसऱ्या वॉर्डामध्ये मतदार नोंदी झाली असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा – सुनील शिंदे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीची निवडणूक जवळ येईल तसतसे इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी वाढतच चालली आहे. आरक्षणामुळे ज्यांची अडचण झाली आहे असे उमेदवार दुसऱ्या वॉर्डात आपले बास्तान बसवायचे सुरु केले आहे. यासाठी आपल्या नातेवाईकांची, अप्तेष्टांची आणि हुकमी मते घेऊन आपल्या सोयीच्या वॉर्डात त्या मतदारांची खोटे पुरावे सादर करून वेगळ्या वॉर्डात मतदार नोंदी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी खोटे पुरावे जोडून मतदार वेगळ्या वॉर्डात नोंदणी केली असेल तर मतदार व घरमालक यांचेवर फौजदारी दाखल करावी असे निवेदन आजरा नगरपंचायतिच्या मुख्याधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राजकीय लोकांनी राहते घर एका वॉर्डामध्ये आणि डुप्लिकेट (बदली)राहणारे ठिकाण दुसरे दाखवले असेल आणि त्यावर तक्रारी असतील तर आपण त्या मतदाराच्या चौकशीसाठी अधीकारी पाठवणार आहात त्यावेळेला ज्याने तक्रार केली असतील त्याला सुद्धा हजर राहणेची लेखी कल्पना द्यावी. सदरचा पंचनामा तक्रारदार, मतदार व सदर घरमालक यांचे समोर व्हावा. त्याला गल्लीतील काही साक्षी घ्याव्यात. जर सर्व माहिती खोटी झाली तर त्या घरमालक व मतदारावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्याचे मतदान तो ज्या घरात कायमस्वरूपी राहतो ते घर ज्या वॉर्डात आहे त्या ठिकाणीच त्या मतदाराची नोंदणी त्याला करणे भाग पाडावे. यामुळे ही बदल होणारी बोगस मते लोकशाहीचा खून करीत आहेत. त्याचबरोबर आपण नगरपंचायतीचे सक्षम अधिकारी आहात. एक सुज्ञ भारतीय नागरिक आणि जागरूक मतदार म्हणून मी आपल्याकडे न्यायाची अपेक्षा करीत आहे. मतदारांची मते एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात बदली करीत असताना प्रत्येक वॉर्डातील मतदार संख्या सारखी किंवा समतोल रहावी याची दक्षता घेणे गरजेचे आहे. नाहीतर असमतोल मतदार संख्येमुळे जास्त मतदार संख्येच्या वॉर्डातील उमेदवारावर अन्याय केल्यासारखे होणार असून यापलीकडे आपलेकडून अन्याय झालेस तक्रारदरांच्याकडून त्यांच्याकडील पुरावे घेऊन मा. निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचेकडे न्याय मागावे लागेल. त्यामुळे निरपेक्ष चौकशी करून योग्य न्यायाची मागणी या निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे (सर) यांनी आजरा नगरपंचायतिच्या मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

युट्युब लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=8CVnKR338XXteBA3

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular