Homeघडामोडीआजऱ्यात विकासाचे नवे चित्र उभे करणार : संजय सावंत

आजऱ्यात विकासाचे नवे चित्र उभे करणार : संजय सावंत

आजऱ्यात विकासाचे नवे चित्र उभे करणार : संजय सावंत

नवीन पाणी योजनेवर थेट प्रश्न, पारदर्शी कारभाराचे आश्वासन

आजरा ( अमित गुरव ) -:
आजरा परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजयभाऊ सावंत यांनी पत्रकार परिषदेत शहरातील विकासकामांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “१४ कोटींची योजना २४ कोटींवर गेली, पण पाणी अजूनही नळातून दिसत नाही; हे नेमके कोणत्या व्यवस्थापनाचे उदाहरण?” असा सवाल त्यांनी केला.

संजय सावंत यांनी स्पष्ट केले की आजरा शहरात गेल्या काही वर्षांपासून स्वच्छता, आरोग्य सेवा, रस्ते, गटर्स आणि मूलभूत सुविधा यांची अवस्था दयनीय आहे. “मनमानी कारभाराला आजरेकर कंटाळले आहेत. लोकशाही टिकवण्यासाठी जनतेसोबत लढण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.


मोफत रुग्णवाहतूक व महिलांसाठी सुविधा

सावंत यांनी जाहीर केले की शहरातून ग्रामीण रुग्णालयापर्यंत मोफत वाहतूक सेवा सुरू करणार आहेत.
तसेच महिलांसाठी सुरक्षित स्वच्छतागृहे, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्क, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शहरातील स्वच्छता यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संकटात उभे राहिल्याची आठवण

कोरोना काळात, पुरपरिस्थितीत तसेच शहरातील विविध संकटात सावंत यांनी केलेल्या मदतीची उदाहरणे पुढे ठेवत त्यांनी जनतेची साथ मागितली. “शेकडो नागरिकांचे सरकारी अर्ज विनामूल्य भरले, अनेक गरजूंना शासन मदत मिळवून दिली. आजरेकरांसाठी हे काम पुढेही सुरूच राहील,” असे ते म्हणाले.*


सांस्कृतिक वारसा जपण्याची घोषणा

आजरा शहराच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला नवी दिशा देण्याचा संकल्प सावंत यांनी व्यक्त केला. नाट्यसंस्कृती, जनकल्याण आणि सांस्कृतिक वारसा या तिन्ही क्षेत्रांत आजरा राज्याच्या नकाशावर उठावदार करण्याचा त्यांचा मानस आहे.


सर्वसमावेशक नेतृत्वाचा विश्वास

संजय सावंत यांनी स्पष्ट केले की आजरा शहरात जातीपातीचे राजकारण कधीच केले गेले नाही आणि पुढेही होणार नाही. सर्व समाजघटकांचा पाठिंबा मिळत असल्याचा त्यांना आत्मविश्वास आहे.
“मी बंटी साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यांचा विश्वास आणि जनतेची साथ मिळाली तर आजरा शहराचा विकास हेच माझं ध्येय असेल,” असे सावंत म्हणाले.


लिंक मराठी विशेष टिप्पणी :
संजय सावंत यांचा प्रचारविषयक सूर या पत्रकार परिषदेत प्रकर्षाने जाणवला. सत्तेवरील टीका, मूलभूत सुविधांची मागणी आणि सर्वसमावेशक विकासाचे दावे—या तिन्हींच्या मिश्रणातून त्यांनी निवडणुकीची दिशा ठरवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते.

✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!

📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular