Homeसंपादकीयपुन्हा तो बाबा अडचणीत

पुन्हा तो बाबा अडचणीत

बाबा का ढाबा हा मागील वर्षी खूप गाजलेला विषय होता. गौरव वासन (फूड ब्लॉगर) ने बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांना रातोरात प्रसिद्ध तर केलेच पण त्यासोबतच लाखोपती ही केले होते. पण कांता प्रसाद यांचे अच्छे दिन आल्यावर त्यांनी गौरव वासन वर आपल्याला दान स्वरूपात मिळालेले पैसे चोरल्याचा आरोप करून खळबळ माजवली. त्यावेळी त्यांच्या समोर मीडिया आणि लोक सतत वावरताना त्यांनी स्वतःला स्वयंघोषित स्टार बनवून घेतले होते. त्यांच्याकडे वकील ही होते (पण ते समाजसेवा म्हणून बाबांची केस लढवत होते म्हणे )
या ब्लॉगरच्या मदतीने त्यांना एक-दोन नाही तर चक्क ४५ लाख रुपयांचे दान स्वरूपात मिळाले होते. त्याच पैशातून त्यांनी नवीन एक रेस्टॉरंट उभे केले. ज्याचा महिन्याचा खर्च लाखभर होता. पण लॉकडाऊन झाले आणि इतर हॉटेल व्यावसायिका प्रमाणे बाबांचे कंबरडे मोडले. यामुळे त्यांनी आपला पूर्वीचा थांबा पुन्हा एकदा सुरू केला .
काही दिवसांपूर्वी कांती प्रसाद यांचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला यात ते गौरव वासन यांची हात जोडून माफी मागत होते. गौरव हा चोर न्हवता आम्ही त्याला असे कधी म्हंटलेच नाही अशी पलटी मारत आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करावे आमच्यात काही लोकांमुळे गैरसमज निर्माण झाले होते पण आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळे आहे तो जेव्हा पाहिजे तेव्हा परत येऊ शकतो आम्ही स्वागतच करू असेही ते यावेळी बोलत होते.
ह्या व्हिडीओ ला प्रतिक्रिया म्हणून की काय पण गौरव ने फक्त “कर्मा” अशी पोस्ट शेअर केली होती पण सध्या शेवट चांगला तर सर्व काही ठीक आहे असे ट्विट करत त्या वृद्ध दांपत्य सोबतचा आपला फोटो शेअर केला.
मला वाटत गौरव वासन हा खूप संस्कारी तसेच समंजस मुलगा आहे. आणि म्हणूनच त्याने कांती प्रसाद यांना इतका मनस्ताप देऊनही मोठ्या मनाने माफ केले. पण त्याला दूध पिताना भाजले आहे त्यामुळे भविष्यात ताक ही फुंकून पिईल. त्याने माफ केले जरी असले तरी कधीतरी दुसऱ्या कोणाचे भले करताना त्याला हा प्रसंग आठवला तर तो त्यांना खुल्या मनाने मदत करू शकेल ? त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे आईवडील आणि चाहते त्याला असे करायला प्रोत्साहन देतील ? हे यक्ष प्रश्न उपस्थित होतात. त्याला या लोकांनी तसे करायला दिलेच तरी कांता प्रसाद सारख्या लोकांवर इतर लोक कितपत विश्वास ठेवतील ? या एका गालबोटाने लोक अश्या गरीब पण होतकरू लोकांना सुद्धा मदत करताना विचार करतील की नाही .
गौरव आम्हाला तुझा अभिमान होता आणि राहील . तुझे कार्य तू असेच अविरत चालू ठेवावेस यासाठी तुला शुभेच्छा.
क्रांती प्रसाद सारख्या कृतघ्न माणसांनी यातून बोध घेऊन गौरव सारख्या लोकांना त्रास देऊन त्यांच्या चांगल्या ध्येयापासून परावृत्त करण्यास भाग पाडू नये इतकीच लिंक मराठी तर्फे अपेक्षा.

तुमच्या आजूबाजूला ही असे समाजशील गौरव वासन असतील तर आम्हाला प्रतिक्रिये व्दारे नक्की कळवा .

  • अमित अशोक गुरव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular