भारताची लोकसंख्या १३५ करोड वर आहे. आज त्यापैकी ९० % लोकांच्या जवळ आधारकार्ड आहेत पण भारतात सर्वात प्रथम आधार कार्ड कोणाचे असेल ? किंवा पहिले आधारकार्ड कोणत्या मंत्राचे , अधिकाराचे की अभिनेत्याचे निघाले असा प्रश्न तुम्हाला कधी पडला होता का ? तर त्याचे उत्तर पुढे आहे..
भारतात पहिले आधारकार्ड बनवणारी व्यक्ती ही कोणी स्टार किंवा नेता नसून सर्वसामान्य कुटुंबियातील व्यक्ती आहे ; विशेष बाब म्हणजे ही महिला असून त्यांचे नाव रंजना सोनवणे आहे. त्या टेंभळी या छोट्याशा गावातून आहेत. २०१० साली त्यांनी आपले आधारकार्ड काढले होते त्यावेळी त्यांना वाटले होते की या आधारकार्ड मुळे त्यांच्या जीवनात खूप मोठा बदल घडेल पण तसे काही झाले नाही .
त्यावेळी मोठे-मोठे नेते व न्यूज चॅनेल वाले त्यांची मुलखात घेण्यासाठी जात पण जसे-जसे ही गोष्ट सामान्य सर्वसामान्य तशे आता कोणी फिरकत ही नाहीत असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी एकवेळ बोलताना खंत व्यक्त केली होती. सध्या त्या मोलमजुरी आणि यात्रेत खेळणी विकून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात.
तुम्ही तुमचे आधारकार्ड काढले तेव्हाचे काही गमतीशीर अनुभव आम्हा सोबत कॉमेंट बॉक्समध्ये share करा .
मुख्यसंपादक