Homeकृषीकोल्हापूर जिल्ह्यात आज - उद्या रेड अँलर्ट

कोल्हापूर जिल्ह्यात आज – उद्या रेड अँलर्ट

कोल्हापूर ( अमित गुरव ) – गेले २ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे काही भागात रेड आणि ऑरेंज अँलर्ट दिला आहे. यादरम्यान प्रतिदिन ७०- १५० मि. मी किंवा त्याहूनही जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड , आजरा , भुदरगड , राधानगरी , शाहूवाडी , पन्हाळा , गगनबावडा या तालुक्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरडी कोसळणे , जुन्या घरांची पडझड होणे या सारख्या घटना संभवतात त्यामुळे खबरदारी घ्यावी असे आवाहन खात्याअंतर्गत केले आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा टीएमसी मध्ये -: १)राधानगरी -४.६४ २) वारणा २५.१४ ३) तुळशी – २ ४) दुधगंगा -१२.५ ५) कासारी १.९२ ६) कडवी -१.३७ ७) कुंभी – १.९७ ८) पाटगाव – २.५५ . ( संदर्भ- पुठारी )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular