Homeआरोग्यवाढत्या वयात सौंदर्याची जाणीवपूर्वक काळजी

वाढत्या वयात सौंदर्याची जाणीवपूर्वक काळजी

१) वाढत्या वयात चेहऱ्याची त्वचा सैलसर होऊ लागते . त्वचेचा घट्टपणा कमी होऊ लागतो . चेहऱ्यावर मोठया आकारात छिद्रे दिसू लागतात . वयाच्या तीस वर्षानंतर तेलकट वा संमिश्र त्वचेवर छिद्रे दिसायला लागतात . चांगल्या क्लिन्झरने त्वचा साफ करून टोनिंग केल्यास तेलकट त्वचेची छिद्रे कमी होतात .

२) संत्री , मोसंबी आणि इतर केशरी लाल फळे , गाजरे , भोपळा , बीट , आंबे यांचा आहारात समावेश असावा . आळशी बिया , अक्रोड इ. ओमेगा थ्री फ्याटी (Fatty) आम्लयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्यावा . म्हणजे त्वचेवरील छिद्रे सुरकुत्या कमी होतील . तैलग्रंथींच्या सभोवती कोलेजन ताठर होऊन छिद्राची जागा घट्ट होईल .

३) ओठावर सारखी जीभ फिरवण्याची सवय बहुतेक लोकांना असते . त्यामुळे ओठ काळसर पडू लागतात . सूर्यप्रकाशात सारखे जाणे होत असल्यास त्यासाठी सन प्रोटेक्शन क्रीम लावावे . जसे UVA व UVB अशा दोन्ही क्रिया देणारे संयुक्त क्रीम लावावे . ओठांकरिता लीप बाम ज्यावर SPF १५ आहे असे विकत घेऊन लावावे .

४) वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर काळे / तपकिरी डाग येऊ लागतात . मिनरल पावडर फाउंडेशन लावल्यास डाग हलके दिसतात . वारंवार चार ते पाच तासानंतर सनस्क्रीन लावावे . हातांना Hand Lotion लावावे . पर्समध्ये ट्यूब ठेवल्यास आधून मधून लावण्यास सोपे जाते .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular