भारताची सर्वात जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. जवळपास ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. शहरात जाऊन पैसे कमावणे कित्येक लोकांना वेगवेगळ्या कारणास्तव जमत नाही ( शिक्षण कमी , राहणे , जेवण , राहणीमान , आरोग्य इ ) कारणे त्यात असू शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना विकसित करण्यासाठी सरकारचे पण विशेष प्रयत्न करत आहेत. आज आम्ही गावातून कोणते व्यवसाय सुरू करू शकता हे आहोत.
१) अंडी शॉप – : अंडी खाण्याचे प्रमाण अधिक आहे. आज – काल तर कोरोना मुळे बरेच लोक अंड्यावर जोर देताना दिसतात. आरोग्यासाठी फायदा होत असल्याने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी साठी लोक वर्षभर अंडी विकत घेतात.
शॉप साठी मोठी जागा लागत नाही. आणि आपल्या जवळच्या पोल्ट्री फार्म कडून किंवा एखाद्या एजंट कडून अंडी घ्यावीत.
२) कापड दुकान -: कपडे खरेदीसाठी लग्न , वाढदिवस , किंवा यात्रा लागते असे चित्र आजकाल दिसत नाही. फॅशन साठी कपडे घेण्याचे वेड लोकांना आहे. एकदा सिनेमा आला आणि त्यात कोणतातरी फॅशनेबल ड्रेस असेल तर त्याची चाल जास्त चालते.
तुम्ही विशिष्ट व्यक्तीची कपडे ठेवणार की सर्वांची त्यावर तुमचे भांडवल किती लागेल ते अवलंबून राहील.
३) रिचार्ज शॉप – फक्त मोबाईल रिचार्ज करणे नसून रिचार्ज शॉप मध्ये तुम्ही टेव्ही रिचार्ज सुद्धा करू शकता.
मोबाईल आणि टेव्ही नाही असे घर सापडणे म्हणजे थोडे कठीनच काम आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कौशल्यावर लोकांना आकर्षित करून व्यवसाय नक्कीच वाढवू शकता.
४) शिवण काम – घरी बसल्या बसल्या सुद्धा शिवणकाम करून महिला किंवा पुरुष हे काम करू शकतात. ड्रेस , ब्लाउज , शर्ट- पॅन्ट असे नानाविध प्रकारामध्ये तुम्ही एकाद्या प्रकारात तज्ञ झालात तर लोक तुम्हाला शोधत येतील.
५) कन्सल्टंट – हेल्थ इन्शुरन्स , वाहन , आरोग्य , कृषी , ऑनलाइन सेवा कन्सल्टन्सी करून सुद्धा तुम्ही लोकांना मदत करता करता त्याचा थोडा फार मोबदला घेऊ शकता.
६)वाळू डेपो – घर बांधण्यासाठी वाळू , खडी , सिमेंट तर लागतेच जर तुम्ही वाळू डेपो चालू केला तर त्यातुन नक्कीच कमाई करू शकता. कारण दरवर्षी बांधकाम होत असते.
तुमच्या भागातील गवंडी , इंजिनिअर , आणि लोकांच्या साह्याने ही व्यवसाय आयडिया प्रभावी ठरू शकते.
अश्याच नानाविध व्यवसाय आयडिया पाहण्यासाठी लिंक मराठी त बिझनेस या कॅटगरी मध्ये जावे.
तुम्हाला कोणत्या बिझनेस बद्दल डिटेल्स माहिती हवी असेल तर आम्हाला कॉमेंट करून कळवा. आम्हाला पूर्ण डिटेल्स देण्यासाठी नक्कीच आवडेल.
मुख्यसंपादक