📌 कर्जे महागणार ? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उद्या जाहीर करणार पतधोरण.
• रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर स्थिर आहे.
• घाऊक बाजारातील महागाईने १३.११ टक्क्यांचा धोकादायक स्तर गाठला आहे.
• रिझर्व्ह बँकेचे महागाईचे उद्दिष्ट ४ टक्के इतके आहे.
📌 क्रिप्टो करन्सी झाले स्वस्त; बिटकॉइन, इथेरियमसह प्रमुख चलनांना नफावसुलीचा फटका.
• डिजिटल टोकन्सला आज नफावसुलीचा फटका बसला.
• आज गुरुवारी बिटकॉइन, इथेरियम, डोजेकॉइनच्या किंमतीत ४ ते १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
• एक बिटकॉइनचा भाव ४३३९७.९६ डॉलर इतका घसरला आहे.
📌 जीएसटी रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईतील एका कंपनीनं ९८ कोटींच्या बोगस पावत्या बनवल्या.
• जीएसटी अँटी-इव्हेशन युनिटने बनावट इनपूट टॅक्स क्रेडिड (ITC) रॅकेट उद्ध्वस्त केले.
• इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी ९८ कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचा वापर.
• १४ पेक्षा जास्त अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांनी जारी केलेल्या बोगस पावत्यांवर बनावट ITC दिले.
मुख्यसंपादक