कोल्हापूर (अमित गुरव ) -: कोल्हापूर महानगरपालिका कत्तलखण्यातील बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात प्रहार चे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी तक्रार दिली होती.
२४ डिसेंबर रोजी सहाय्यक आयुक्त (अन्न ) त्या कत्तलखाण्याच्या तपासणी साठी गेले असता विजय पाटील (पशुवैद्यकीय अधिकारी) तिथे उपस्थित नसल्याचे आढळून आले तरीही त्यांच्या अनुपस्थितीत बकरी कापून ती विक्रीस पाठवण्याचे कामकाज सुरू होते.
अश्या अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या या अनुषंगाने सदर कत्तलखाना तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कत्तलखाण्यावर कारवाई झाली पण कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार तरी कधी ? अशी प्रतिक्रिया कोळी यांनी लिंक मराठी ला दिली.
मुख्यसंपादक