HomeUncategorizedप्रेमात नको इतका रुसवा…

प्रेमात नको इतका रुसवा…

नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींनो,
आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी कोणावरती का होईना प्रेम केल असेल,कधीतरी कोणावरती तरी जीव ओवाळून टाकला असेल,आपल्या प्रेमासाठी कित्येक रात्री जागून काढल्या असतील,कधी प्रेमात खळखळून हसला असाल तर कधी धायमोकळून रडला असाल,कोणी नवीनच प्रेमात पडत असाल तर कोणी प्रेमात सुंदर आयुष्य जगत असाल तर कोण प्रेमभंग झाल्याने उदास असाल तर सर्वांना माझा प्रथम मानाचा मुजरा,आता तुम्ही म्हणाल काय हे मानाचा मुजरा काय हो मित्रानो प्रेम होणं,प्रेमात जगणं आणि प्रेमात असणं हे पण नशिबात असावं लागतं…म्हणूनच कोणीतरी फार सुंदर म्हटली…

हर किसिको नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में,
खुश नशीब हैं वो जीन्हे मिली ये बहार जिंदगी में…

कुणासाठी तरी तहान भूक हरवून स्वतःच्या दुनियेत जगायला शिकवणारी भावना म्हणजे प्रेम,नकळत कोणाच्यातरी काळजीत जीव कासावीस होणं म्हणजे प्रेम, एखाद्यासाठी काहीपण करण्याची तयारी म्हणजे प्रेम,एकमेकांच्या सुखाचा द्यास म्हणजे प्रेम,कुणासाठी तरी हरण म्हणजे प्रेम,कोणासाठी तरी तरफडण म्हणजे प्रेम….

प्रेम म्हणजे काय यावर बोलायला गेलं तर आपोआप खुप काही सुचत जातं…

प्रेम म्हटलं की प्रेमभंग आलाच, प्रेमभंग होण्याची बरीच कारणे आहेत, पहिलं कारण अती प्रेम,म्हणजे अस म्हणा ना प्रेमाला उत येणं,आपण जिच्यावर/ज्याच्यावर प्रेम करतो तिचा 24 तास ध्यास लागणं,तिच्याशिवाय दुसरं काहीच न सूचन,पहिल्या 1 दोन महिन्यात अस प्रेम उतू येतं,मग भेटीगाठी वाढतात,सुरवातीला भेटून गेल्यावर रस्त्याने घरी जायीपर्यंत सुद्धा फोन सुरू असतो,सकाळी उठल्यावर पहिला फोन तिचाच हवा असतो पहिला मग ते रात्री झोपेपर्यंत शेवटाचा फोन सुद्धा तिचाच अपेक्षित असतो,भेटीगाठी वाढतात मनासोबत शरीर जवळ येतात आणि उतू चालेल प्रेम आटायला लागतं,मग जे सुरुवातीला चालू होत ते सगळं कमी व्हायला लागतं मग त्यातून सुरुवातीला छोटे छोटे वाद सुरू होतात,मग पाहता पाहता तो छोटा वाद भांडणात रूपांतरित होतो,मग पूर्वी एकमेकांच्या फोनची वाट बघणारी प्रेम पाखरं आता एकमेकांचे फोन टाळायला लागतात…आणि याचा शेवट होतो प्रेमभंग….आजच्या तरुणांच्या भाषेत ब्रेक अप…

अशी प्रेमभंग होण्याची अनेक कारणं सांगता येतील,प्रेमात एकमेकांना गृहीत धरणं,प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा करणं,सतत जोडीदारावर संशय घेणे,वारंवार भेटणे अथवा भेटण्याचा आग्रह धरणे,समोरच्याची गोष्ट न ऐकता मनानेच सगळं ठरवणे आणि त्याचा दोष जोडीदाराला देत राहणं,आणि सगळ्यात मोठं कारण गैरसमज…अशा अनेक कारणांमुळे प्रेमभंग होतात…

प्रेमभंग झाल्यावर आपण काय करतो आणि काय करायला हवा यावर बोलू…

प्रेमभंग झाल्यावर कित्येक लोक मग ते कोणत्याही वयाचे असू देत लगेच डिप्रेशन मध्ये जातात, आपलं संतुलन बिघडवून बसतात,काही महाभाग तर मेरी नहीं तो किसिकी नहीं अशा तोऱ्यात समोरच्याला संपविण्यापर्यंत जातात,कधी समोरच्याला संपवतात तर कधी दोघांनाही,तर काही लोकं या दुःखाला इतके कुरवाळत बसतात की ते विसरण्यासाठी मग व्यसनाच्या आहारी जातात,तर कित्येक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात,प्रेमात उध्वस्त झालेली अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत….

कधीतरी एकमेकांच्या सुखासाठी तरफडणारे दोन जीव अशावेळी ते दिवस का विसरतात,कधीतरी एकमेकांवर खुप विश्वास असणारी दोन मने तो विश्वास का विसरून जातात,एकमेकांना खूप समजून घेणारे ते दोन प्रेमी अशा वेळी समजूतदार पण का हरवून बसतात, समोरच्याच्या चुका समजून आपल्या चुकांवर एवढ्या अलगद पांघरून का घालतात हे प्रेमवेडे….

प्रेमभंग झाला म्हणजे दुःख होणार यात शंकाच नाही, माझ्यासारख्याना त्यांच्या दुःखाची कल्पना नाही असं नाही पण तरी सुद्धा प्रेमविरानो प्रेम म्हणजे सुंदर भावना त्याचा शेवट वाईट कसा असू शकतो,मान्य आहे मन तुटल्यावर वेदना होतातच पण त्याची किंमत जीव घेणं किंवा देणं असू शकतं नाही ना,कधीतरी आपल्या प्रेमाच्या सुखताच आपलं सुख पाहिलं होतं ना मग त्याला आपण दुःखी करून काय साध्य करतो की आपलं प्रेम स्वार्थी होतं हे,नाही जिथे प्रेम असते तिथे स्वार्थाला थाराच नाही,वेगळे झालो म्हणून आपल्यातला माणूस सैतान कसा होऊ शकतो,प्रेमासारखी सुंदर भावना अस चुकीच् कारस्थान कसं करू शकतात…

प्रेमभंग झाल्यावर एकदा समजून घ्यायचा प्रयत्न नक्की करा,प्रेमाच्या सुरुवातीला आपल्या सुखात सुख मानणारा जिवलग वैरी कसा असू शकतो,प्रेमभंग झाल्यावर वेदना एकाच बाजूला नाही होत तर दोन्ही बाजूला सारख्याच वेदना होतात सारखाच त्रास होत असतो पण आपण अबोला धरतो आणि कित्येक गोष्टी हरवून बसतो,आता मोबाइलच्या दुनियेत एकमेकांना ब्लॉक करणं बोलण्याच एवढं सुंदर साधन जवळ असून फोन घेणं टाळणं,योग्य कसं असेल,आपलीच व्यक्ती वारंवार फोन करत असेल तर मित्रांनो अजूनही त्या व्यक्तीला आपल्याशी नातं तोडायच नाही हे समजून घ्या,एकदा मनमोकळे पणाने बोला,आणि तरीही वाद नाहीच मिटले तर मित्रांनो गोडीत वेगळे व्हा,प्रेमाचे धागे एव्हढे कच्चे नसतात,समजून घेऊन चालला तर प्रेम आयुष्य घडवत उधवस्त नाही करत हे लक्षात येईल,आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सुशांत सिंग राजपूत तिच्या प्रेयसीला 6 दिवस फोन करत होता पण तिने त्याला ब्लॉक केल होतं,जेंव्हा त्याने जीव दिला तेंव्हा त्याच्या त्याच प्रेयसीला खुप दुःख झालं आणि तिला मनापासून वाटलं काश मी एकदा त्याच्याशी बोलले असते तर हा अनर्थ टळला असता पण वेळ निघून गेल्यावर आलेले शहाणपण काय कामाचे…

तेंव्हा मित्रानो आहात तोपर्यंत एकमेकांना समजून घ्या,स्वतःलाही थोडं समजून घ्या,कधी कधी काही नाती आयुष्यात एवढी मोठी पोकळी निर्माण करून जातात की ती पोकळी कधीच भरून निघत नाही तेंव्हा वेळीच ती पोकळी निर्माण होणार नाही याची काळजी घ्या…

प्रेम ही भावना खुप सुंदर आहे ती जगून घ्या,एकमेकांवर भरभरून प्रेम करा,आता एकमेकांच्या प्रेमात असाल तर एकमेकांना वेळ द्या,लक्षात ठेवा गेलेली वेळ परत कितीही पैसा टाकला तरी परत आणता येत नाही,आज जर एकमेकांचे हातात हात असतील ते ते घट्ट पकडुन ठेवा, रुसवे फुगवे यात वेळ घालवू नका एकमेकांना जपा,प्रेम करा ते निभवा आणि सुखी राहा…

प्रेम नव्हे रे हा भातुकलीचा खेळ,*
दोन जीवांच्या भावनांचा तो एक मेळ,
प्रेम नव्हे रे हा बाहुला बाहुलीनचा खेळ,
दोन मनांच्या यातनांचा तो एक मेळ…

लेखिका –
नेहा नतीन संखे ( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular