डॉक्टर बनायचे होते पण मराठी मधून करता आले असते तर किती मज्जा आली असती मी पण डॉक्टर होऊन माझे स्वप्न साकार केले असते. अश्या विद्यार्थी साठी येत्या शैक्षणिक वर्षापासून ( 2023 ) महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय शिक्षण मराठी तुन मिळणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी मधून तयार करण्याची प्रक्रिया सूरु होती. त्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.वैद्यकीय शिक्षण मराठी मधून घेता येत असले तरी ते बंधनकारक नसून ऐच्छिक आहे . त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एमबीबीएस , आयुर्वेद , होमिओपॅथी , दंतचिकित्सा , नर्सिंग , फिजिओथेरपी हे अभ्यासक्रम मराठी भाषेतून शिकता येतील . दरम्यान भाषेत बदल झाला तरी अभ्यासक्रम तोच असेल असे शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले .
मुख्यसंपादक