Homeघडामोडीपत्रकार कै. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. - कोल्हापूर...

पत्रकार कै. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. – कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन आजरा तालुका

पत्रकार कै. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. – ( आजरा पत्रकार संघटनेच्या वतीने आजरा तहसीलदारांना निवेदन.)

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील पत्रकार संघटनेच्या वतीने आजरा तहसिलदार यांना
शशिकांत वारिशे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कारवाईची निवेदनाद्वारे मागणी. करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांची नियोजनबद्ध अपघात घडवून हत्या करण्यात आली या निषेधार्थ पत्रकारांच्या विविध संघटनांच्या वतीने संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या वतीने कै. शशिकांत वारीसे यांना श्रद्धांजली वाहण्यात झाली.


यावेळी बोलताना आजरा ता. अध्यक्ष संभाजी जाधव म्हणाले, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी त्यामुळे अन्याय करण्याच्या करण्याच्या कल्पना करणाऱ्या व्यक्तींनी लक्षात ठेवावे की लेखणी बाजूला ठेवून दंडुकी हातात घेण्याची आमची तयारी आहे. पत्रकार बांधवांनी अन्याय विरुद्ध लढण्यासाठी सजग राहावे कारण केवळ निषेध करून उपयोग नाही. तर काही वेळा जशास तसे उत्तर देण्याची तयारीही पत्रकारांनी ठेवली पाहिजे. असे श्री. पत्रकार जाधव म्हणाले. सदर आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी. अन्यथा जिल्हाअध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा पवित्रा घ्यावा. लागले असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा कमिटी सदस्य ज्योतीप्रसाद सावंत, कार्यकरणी सदस्य आजरा – सचिन चव्हाण, रणजित कालेकर, प्रा. रमेश चव्हाण, सुनिल पाटील, सुभाष पाटील, कृष्णा सावंत, श्रीकांत देसाई, सुभाष पोवार, अमित गुरव, सचिन कळेकर सह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular