पेरणोली ता.आजरा- येथील प्राथमिक केंद्रीय शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत ओळखपत्र वाटपाचा समारंभ उत्साहात संपन्न झाला.
डॉ.पोवार चँरिटेबल ट्रस्ट व फौंडेशन उत्तूर यांच्यावतीने इयत्ता पहिली मधील २३विद्यार्थ्यांना मोफत ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजीत फगरे होते.तर सरपंच उषाताई जाधव यांची प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी काँ.संपत देसाई म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षण मिळणे हा हक्क आहे.शाळेत शिक्षक, सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे कर्तव्य आहे.त्यामुळे मताच्या अधिकारातून सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे.तानाजी देसाई म्हणाले, मराठी शाळा टिकवणे काळाची गरज आहे.मराठी भाषा व शाळा वाचवण्यासाठी संघटीत प्रयत्न आवश्यक आहेत.
कृष्णा सावंत म्हणाले,शिक्षण म्हणजे उत्पादनाचे साधन आहे.कोणतेही शासन शाळा व शिक्षणापेक्षा मंदीरांना महत्त्व देते.मंदिरे आवश्यक असले तरी त्यापेक्षा शाळेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.शासनाने शाळेऐवजी मंदीरासाठी २५० कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.त्यावरून शाळा मोडित काढण्याचे धोरण दिसत असून याविरुद्ध पालकांनी आवाज उठवण्याची गरज आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सचिन पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक विठ्ठल कदम यांनी केले.
यावेळी पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांना डॉ. पोवार यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राजेंद्र सावंत,अमर पवार,हिंदुराव कालेकर,हरपवडे सरपंच वैशाली गुरव,डॉ एस जी पोवार,उपाध्यक्षा अमृता जाधव,मुख्याध्यापिका जयश्री वरेकर,शितल कुदळे,काका देसाई, संजय दळवी,डॉ. सुरेश पोवार, प्रिती कांबळे, राजश्री तोरसकर, नितीन पाटील, विजयआयवाळे,गणपती नगरपोळे , शिवाजी कुदळे,पूनम मोरबाळे आदी उपस्थित होते.अनुष्का गोवेकर यांनी सूत्रसंचालन केले.कविता नाईक यांनी आभार मानले…
मुख्यसंपादक