Homeआरोग्यडाळिंब का खावे ?

डाळिंब का खावे ?

डाळिंब व डाळींबाचे पान-फुल साल हे आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत….

१) डाळिंब उष्णता नाशक व पित्तशामक आहे.

२) पिकलेल्या डाळिंबाचे रस, किंवा त्याच्या सालीचा दोन ते तीन चमचे रस खोकल्या मध्ये भारीच आराम देतो.

३) डाळिंबाची चार-पाच पाने घेऊन स्वच्छ धुवावीत. व त्यांचा दोन थेंब रस काढून डोळ्यांमध्ये टाकल्याने,डोळे खाज होणे,डोळे लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे या समस्या बंद होतात.

४) डाळिंबाच्या फुलाचा दोन चमचे रस काढून नाकामध्ये टाकल्याने नाकातून रक्त येण्याची समस्या बंद होते.

५) सुकलेल्या डाळिंबीच्या सालीचे चूर्ण एक चमचा एक कप थंड पाण्यासोबत घेतल्याने, जुलाब-अतिसार बंद होतात. पोटातील जंत मरतात व आतड्यावर आलेली सूज कमी होते.

६) तोंड आल्यानंतर पंधरा-वीस डाळिंबाचे पाने घेऊन थोडीशी चेचून एक तांब्या पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. दिवसातून दोन-तीन वेळा या पाण्याने चुळा भराव्यात. तोंड आलेले निघून जाते.

७) डाळिंबाच्या पानाचा 3 ते 4 चमचे रस अर्धा कप कोमट पाण्यासोबत सकाळी उपाशीपोटी पिल्याने बवासीर मध्ये छान फरक पडतो.

८) तोंड बेचव झाले असेल तोंडाला चव नसेल. अशा वेळेस डाळिंबाचे दाणे सोबत जिरे पावडर व काळे मीठ खाल्ल्याने. किंवा ज्यूस करून पिल्याने तोंडाला चव येते. व अजीर्ण दूर होते.

९) हृदय विकाराच्या रुग्णांनी रोज एक कप डाळिंबाचा रस पिल्याने हृदय मजबूत होते.व हृदयाच्या समस्या दूर होतात.

१०) पाव चमचा डाळिंबाच्या सालीचे चूर्ण एक चमचा मधा सोबत दिवसातून दोन-तीन वेळा चाटण केल्यास खोकला कप निघून जातात.

डाळिंबाच्या फळा सोबत डाळिंबाच्या फळाची साल डाळिंबाचे पान फूल हे सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. फायदेशीर आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular