भादवण (ता. आजरा) —
कै. रंगुबाई रामचंद्र गुरव (वय 92) यांचे वार्धक्याने आज शुक्रवार , दि. 16 जानेवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने गुरव कुटुंबावर शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्या अशोक गुरव ( भादवण सोसायटी संचालक) तसेच तुकाराम गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य) यांच्या मातोश्री होत. शांत, कर्तव्यदक्ष आणि कुटुंबवत्सल स्वभावासाठी त्या ओळखल्या जात.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, तीन मुली तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै. रंगुबाई गुरव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून रक्षाविसर्जन सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.

मुख्यसंपादक


