Homeघडामोडीरिक्षाचालकाचा आदर्श ! १.५ लाख किमतीचा मोबाईल मालकाला परत

रिक्षाचालकाचा आदर्श ! १.५ लाख किमतीचा मोबाईल मालकाला परत

रिक्षाचालकाचा आदर्श! १.५ लाख किमतीचा मोबाईल मालकाला परत

नांदेड(प्रतिनिधी) – प्रामाणिकपणा आजच्या काळात दुर्मिळ होत चालला असतानाही समाजात अजूनही काही उदाहरणं अशी आहेत, जी विश्वास वाढवणारी ठरतात. अशाच एका प्रसंगाचा अनुभव नांदेडकरांना आला.

टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे सदस्य अब्दुल मुबीन अब्दुल मजिद (रा. हजरत फिर बुऱ्हाणनगर, नांदेड) यांच्या रिक्षामध्ये प्रवास करत असताना वैष्णवी (रा. श्रीनगर, नांदेड) हिने आपला iPhone 14 Pro Max (किंमत सुमारे १,५०,००० रुपये) विसरला गेला.

श्रीनगर ते चौक या प्रवासादरम्यान मोबाईल रिक्षातच राहिला. घरी पोहोचल्यानंतर मोबाईल हरवल्याची जाणीव झाली. तिने कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल बंद होता.

दरम्यान, अब्दुल मुबीन यांना मोबाईल आढळून आला. त्यांनी तो चार्ज करून टायगर ऑटो संघटनेचे शहराध्यक्ष मुखीद पठाण यांच्याशी संपर्क साधला. मुखीद पठाण यांनी ही माहिती प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा) यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी लगेच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांना माहिती दिली.

पोलीस आणि संघटनेच्या समन्वयाने मोबाईल सुरक्षितपणे वैष्णवीकडे परत करण्यात आला. मोबाईल परत करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तांबे, अहमद (बाबा), मुखीद पठाण, शेख अहमद, बबलू पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

हा प्रसंग प्रामाणिकपणाचं आणि समाजातील चांगुलपणाचं जिवंत उदाहरण ठरला आहे. रिक्षाचालक अब्दुल मुबीन यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअँप चॅनेल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular