आजरा (हसन तकीलदार ):-बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव गावातील एका बौद्ध तरुणास जात आणि धर्म विचारून निर्वस्त्र करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या लोकांवर ऍट्रॉसिटी गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई होणेबाबतचे निवेदन आजरा तालुका रिपब्लिकन सेनेतर्फे आजरा तहसीलदार समीर माने आणि आजरा पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या गावात राहणाऱ्या एका बौद्ध तरुणांस गाय चोरीच्या संशयावरून धर्म विचारून निर्वस्त्र करून मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये या तरुणाचे नाकाचे हाड मोडले आहे व एका डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोळा निकामी झाला आहे. तेव्हा या गुन्ह्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करून आरोपीना अटक करावी आणि कठोरात कठोर शासन करावे जेणेकरून यानंतर पुन्हा असे गैरकृत्य करणार नाहीत. कारवाईत दिरंगाई झालेस आणि न्याय मिळाला नाही तर निषेध आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर अविनाश कांबळे (तालुका युवाध्यक्ष ), विजय कांबळे (तालुकाध्यक्ष ), गोपाळ होण्याळकर (तालुका उपाध्यक्ष ), परशुराम कांबळे (तालुका संपर्क प्रमुख ), नंदकुमार कांबळे (तालुका महासचिव ),मधुकर कांबळे (तालुका युवा उपाध्यक्ष ), संभाजी कांबळे (तालुका सचिव ), शामराव कांबळे(सामाजिक कार्यकर्ते), शेखर देशमुख, बाबासो कांबळे, अमित सुळेकर, अरुण कांबळे, अनिल प्रधान, राहुल मोरे, दौलती कांबळे, धनाजी कांबळे, अशोक कांबळे, रोशन कांबळे, संजय कांबळे, नितीन राऊत,उत्तम कांबळे आदींच्या सह्या आहेत.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



