आजरा (प्रतिनिधी हसन तकीलदार) :
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणूस नातेसंबंध, आपुलकी आणि एकत्र कुटुंब पद्धती विसरत चालला आहे. अशा परिस्थितीत देवर्डे (ता. आजरा) येथील पाटील कुटुंबियांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. “एक कुळ एक गणपती” या संकल्पनेतून पाटील कुटुंब दरवर्षी सामूहिकरित्या गणेशोत्सव साजरा करत आहे.

विखुरलेली ( स्वतंत्र) कुटुंब पद्धती ही आपल्याला शहरात पहावयास मिळायची पण हे चित्र आता ग्रामिण भागातही पहावयास मिळत आहे. पण देवर्डे येथे तिसऱ्या वर्षी हा उत्सव कौटुंबिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होत आहे. एकाच मूर्तीच्या साक्षीने सर्व कुटुंबीय एकत्र येतात, प्रसाद, भक्ती, स्नेह, आदर यांची देवाणघेवाण होते. यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतात, दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतात आणि ग्रामिण समाजात एकोप्याची भावना वाढीस लागते.
या उपक्रमामुळे ध्वनी व वायूप्रदूषण रोखण्यास मदत होत असून फटाक्यांवरील खर्चालाही मर्यादा येते. कुटुंबीयांनी पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.

सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी सांगितले की, “ही संकल्पना केवळ देवर्डेच नव्हे तर इतर गावांनाही प्रेरणादायी आहे. सदस्य संख्येमध्ये दरवर्षी वाढ होत असून ‘एक कुळ एक गणपती’ ही परंपरा समाजातील ऐक्याला नवीन दिशा देत आहे.”
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



