आजरा (अमित गुरव ) –वसंतराव देसाई (गवसे) साखर कारखान्यात कार्यरत असलेले कर्मचारी प्रकाश गणपती घेवडे (वय ५२, रा. उत्तूर) यांचा दुचाकी घसरून अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली.
ही घटना आजरा-आंबोली मार्गावरील मसोली गावानजिक घडली असून, दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची नोंद आजरा पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
प्रकाश घेवडे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांचं अकस्मात जाणं कुटुंबासाठी मोठा आघात ठरला आहे. उत्तूर गावात आणि आजरा तालुक्यात या घटनेमुळे शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लिंक मराठी व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून लिंक मराठी Live चे अपडेट पाहू शकता .
*Follow Us*

मुख्यसंपादक