Homeघडामोडीभारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृतीची" विटंबना करणाऱ्या इसमाविरोधात व अशी षडयंत्र करणाऱ्या संविधानद्रोहींवर कारवाई...

भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृतीची” विटंबना करणाऱ्या इसमाविरोधात व अशी षडयंत्र करणाऱ्या संविधानद्रोहींवर कारवाई झाली पाहिजे – संविधान संवर्धन चळवळ व पुरोगामी पक्ष , संघटना , संस्था यांची मागणी

भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृतीची” विटंबना करणाऱ्या इसमाविरोधात व अशी षडयंत्र करणाऱ्या संविधानद्रोहींवर कारवाई झाली पाहिजे.अन्यथा संविधानिक मार्गाने करणार आंदोलन-संविधान संवर्धन चळवळ व पुरोगामी पक्ष ,संघटना,संस्था यांची मागणी.

  आज आजरा येथे संविधान संवर्धन चळवळ व पुरोगामी पक्ष संघटना संस्था व्यक्ती यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर तहसीलदार यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. डॉ. उल्हास त्रिरत्ने कॉम्रेड शिवाजी गुरव, नितीन राऊत, किरण के.के. ,मेघराणी भाईंगडे, मनीषा गुरव,संदीप कांबळे,द्वारका कांबळे,शिवाजी इंगळे,दशरथ सोनुले,रविंद्र नावलगी,विजय कांबळे,सुरेश दिवेकर,अमित सुळेकर,दत्तात्रय पाटील,स्मिता कांबळे,महादेव सुतार,डॉ.सुदाम हरेर,महादेव कांबळे,प्रशिक कांबळे,आदित्य कांबळे,सुर्यकांत कांबळे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थितीत होते.

      या निवेदनामध्ये परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील "भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृतीची" विटंबना करून, तोडफोड करण्यात आली. तो इसम परभणी तालुक्यातील मिर्झापुर या गावचा रहिवाशी असुन ती व्यक्ती खेडुत स्वभावाचा असुन, वरील प्रकारचे कृत्य करण्यासाठी त्या व्यक्तीस कोणी भाग पाडले? या सर्व घटनेमागे फार मोठे षडयंत्र असून, ज्या संघटना, संस्था व व्यक्ती संविधानाला मानत नाहीत, भारतीय राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात, भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलून धार्मिक ढाचा बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा सर्व संघटना, संस्था व व्यक्ती यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा आहे. अशी भूमिका मांडली आहे.

या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1)दिनांक 10/12/24 रोजी सायंकाळी 5.00 च्या दरम्यान, परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील (Constitution replica) “भारतीय राज्यघटनेच्या प्रतीकृ‌ती” ची विटंबना करुन तोडफोड करणाऱ्या इसमा विरूद्ध आणि अशा घटना करायला लावणाऱ्या व षडयंत्र करणाऱ्या यंत्रणेचा सुत्रधार शोधण्यासाठी “केंद्रीय अन्वेशन विभाग” यांच्या तर्फे तपास करून योग्य ती जलदगतीने कारवाई व कार्यवाही ताबडतोब करणेबाबत…

2) ज्या संघटना, संस्था व व्यक्ती संविधानाला मानत नाहीत. भारतीय राज्यघटनेचा वारंवार अपमान करतात. भारतीय राज्यघटनाचा मूळ ढाचा बदलून धार्मिक ढाच्या बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा सर्व संघटना, संस्था व व्यक्ती यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा.

3)संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीची सन्मानाने उभारणी करून. त्याची संरक्षणाची जबाबदारी परभणी प्रशासनाने घेतली पाहिजे.

4)आरोपींवर देशद्रोह व राष्ट्र प्रतिष्ठा अवमान अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु अद्याप तसे करण्यात आलेले नाही. यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
वरील मागण्या करून या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आज संविधान संवर्धन चळवळ, बहुजन मुक्ती पार्टी,वंचित बहुजन आघाडी, श्रमिक मुक्ति दल(लोकशाहीवादी), संविधान अभियान-आम्ही भारताचे लोक, रिपब्लिकन सेना, भारत मुक्ती मोर्चा छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघ, भारत मुक्ती मोर्चा महिला महासंघ,मुक्ती संघर्ष समिती या संघटना,पक्ष व संस्थासह कार्यकर्ते सहभागी होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular