आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याचा सन 2025-26 चा गळीत हंगाम 24 ऑक्टोबर 2025 रोजी सुरु होणार असून तालुक्याच्या इतर गावापासून येणारे रस्ते अतिपावसामुळे पूर्णपणे उखडून खड्डे पडलेले आहेत त्यामुळे सदर रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी असे निवेदन आजरा साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
यावर्षी साधारणपणे मे मध्यापासून पावसाने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आजपर्यंत पावसाने उसंत घेतलेली नाही. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. आजरा साखर कारखाना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार असून आजरा शहरापासून साखर कारखान्यापर्यंत येणारा रस्ता नवीन आहे त्यामुळे या रस्त्याची काही अडचण नाही परंतु तालुक्याच्या इतर गावापासून आजरा शहरापर्यंत म्हणजेच महागाव -हत्तीवडे -आजरा, नेसरी -किणे -आजरा, चंदगड -अडकूर -वाटंगी -आजरा, लाटगाव -खानापूर -आजरा, सरोळी -कोवाडे -हाजगोळी -आजरा इत्यादी रस्ते अतिपावसामुळे चाळण होऊन खड्डेमय झाले आहेत. कारखान्याच्या गळीत हंगाम कालावधीत सदर रस्त्यावरून आजरा मार्गे कारखान्याकडे दररोज 400ते 450ट्रक -ट्रॅक्टर इत्यादी वाहनांनी 24 तास ऊस वाहतूक करणार आहेत. त्याचप्रमाणे दररोज 1000 च्या पुढे कर्मचारी, सभासद, शेतकरी, कंत्राटदार येजा करणार असलेने रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. सदरचे रस्ते अतिखराब झाले असलेने रहादारीमुळे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर वित्त व जिवीत हानी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बांधकाम विभागाअंतर्गत येत असलेली उपरोक्त गावांच्या रस्त्यावरील संपूर्ण खड्डे तात्काळ बुजवून घेऊन गाळप हंगामापूर्वी रस्ते दुरुस्त करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, संचालक शिवाजी नांदवडेकर, दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, मुख्यशेतीधिकारी विक्रमसिंह देसाई आदिजण उपस्थित होते.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
युट्युब लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=8CVnKR338XXteBA3

मुख्यसंपादक



