Homeघडामोडीआजरा जिल्हा परिषद कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न पालकमंत्री आबिटकर आणि अशोक चराटी...

आजरा जिल्हा परिषद कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न पालकमंत्री आबिटकर आणि अशोक चराटी यांनी केले मार्गदर्शन

आजरा(हसन तकीलदार):बालक मंदिर शाळेच्या उदघाट्न कार्यक्रमानंतर लगेचच आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील मतदार संघांचे तुकडे केल्याबद्दल आणि जिल्हापरिषद गण कमी केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खंत आणि नाराजी व्यक्त केली. प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले व त्यावेळी पालकमंत्री आणि चराटी यांनी आपले मत व्यक्त करीत आढावा घेतला.


यावेळी श्री. आबिटकर म्हणाले, आजऱ्यातील तीन ऐवजी दोन जिल्हा परिषदेच्या जागा झाल्या. त्यामुळे माझ्याच मतदारसंघातील ४० गावांवर हा अन्याय होणार आहे. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेशी चर्चा करुन हा अन्याय दुरुस्त केला जाईल असे आश्वासन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी केलेल्या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. आजरा तालुक्याच्या समृद्धीसाठी यापुढेही विकासकामे करणार आहे असेही आश्वासन ना.आबिटकर यांनी दिले.ते आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी आजरा बँकेचे व आण्णा भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोक चराटी होते.


आजरा शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी चित्रीवरून 27 कोटींची पाणी योजना नामदार आबिटकर यांनी मंजूर केली. तर २५ कोटींचे रस्ते व गटर्सना मंजुरी मिळाली आणि आता पाऊस सुरू झाला आहे.अधिकारी व कर्मचारी वेळेवर काम करत नाहीत.त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदरची कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार आहे असे अशोक चराटी यांनी सांगितले.
मेळाव्यास विलास नाईक, विजयकुमार पाटील, ज्योत्स्ना चराटी, जनार्दन टोपले, दशरथ अमृते, जयवंत सुतार,संभाजी सरदेसाई, जी.एम. पाटील, संजय चव्हाण, असिफ पटेल, शरीफ खेडेकर, विजय थोरवत,अनिरुद्ध केसरकर, सी.आर. देसाई, मारुती मोरे, गोविंद गुरव यासह विविध गावातून आलेले सरपंच, सेवा संस्थाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular