आजरा (अमित गुरव ) – आजरा तालुक्यातील पोळगाव येथील श्री. पांडुरंग लक्ष्मण कोरेवाडकर यांनी रेशन दुकानातून धान्य वितरणात झालेल्या कथित कपातीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शासनाकडून मंजूर असलेले ठरावीक प्रमाणातील धान्य प्रत्यक्ष वितरणावेळी कमी दिले जात असल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित रेशन दुकानदाराकडून याबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा कमी प्रमाणात धान्य देण्यात आल्याने कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन तपास होण्याची अपेक्षा नागरिकांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

मुख्यसंपादक



