आजरा (हसन तकीलदार):-जर एखाद्या दुचाकी वाहन चालकाला वन्यप्राण्याने धडक दिली आणि त्यात त्याला गंभीर दुखापत अथवा मृत्यू झालेस नुकसान भरपाई मिळत नाही. याच कायद्याला विरोध करीत बहुजन मुक्ती पार्टीने वनमंत्र्यांना निवेदन देत कायद्यात सुधारणा करून अशा वन्यप्राणी अपघात ग्रसतानाही नुकसान भरपाई मिळावी अशी कायद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे.
सोहाळे ता. आजरा येथील रस्त्यात सायंकाळच्या वेळेला डॉ. रोहन जाधव हे सोहाळेतील आपल्या क्लिनिकला वाहनातून जात असताना अचानक एक धीप्पाड आणि पिळदार शरीरयष्टीचा गवा रेडा समोर आला. चारचाकी वाहन होती त्यामुळे त्यांनी लगेच वाहन थांबवले. पाच ते दहा मिनिटे वाट पाहिली तरी तो गवा रस्त्यावरून हालत नव्हता. पिळदार शरीर, पांढरे मोजे घातल्यासारखे पाय अगदी राजेशाही थाटात तो गवा गाडीच्या दिशेने बघत उभा राहिला होता. आणि त्याच वेळी एक महिला व पुरुष दोघे चालत चालले होते. सायंकाळच्या वेळेला प्रकाश मंदावला होता. प्रसंगावधान साधून डॉ. रोहन जाधव यांनी त्यांना आपल्या गाडीत बसवले. हॉर्न करून त्या गव्याला हाकलण्याचा प्रयत्न झाला. तो गवा निघून गेल्यानंतर त्याच्या मागून दोन तीन मिनिटांनी गाव्यांचा कळप आला. गवा गेलाय म्हणून ते पुढे गेले असते आणि त्यांची जर दुचाकी वाहन असती तर ते गाव्यांच्या कळपात सापडले असते. त्यांनी जर त्या महिला आणि पुरुषाला गाडीत घेतले नसते तर बरे वाईट होण्याची शक्यता होती. यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले कि, अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आजरा तालुक्यात घडल्या आहेत. घरातील कमावते कर्ते पुरुष या गव्यांच्या धडकेत बळी पडले आहेत परंतु कायद्यात तरतूद नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. आणि त्यांचे कुटुंब पाण्यात बसले आहे. कायदा माणसाला तारणारा असावा मारणारा नसावा. एखाद्या कायद्यामुळे माणसाचे नुकसान होत असेल तर त्या कायद्यात सुधारणा करणे क्रमप्राप्त ठरते.
*या अनुषंगाने बहुजन मुक्ती पार्टीने या कायद्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. आणि कायद्यात बदल करून नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी त्यांची मागणी आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य व सहभाग नोंदवण्याचे आवाहन डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी केले आहे.
आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचे व्यासपीठ – Link Marathi
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
व्हाट्सअँप चॅनेल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
युट्युब चॅनेल लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=ak-MQWXspL94NUuG

मुख्यसंपादक