आजरा ( अमित गुरव ) -: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू मारुती परीट (एरंडोल) यांची, तर आजरा शहराध्यक्षपदी अभिषेक सदानंद रोडगी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा येथे पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र मध्य प्रांताच्या सदस्या ऍड. सुप्रिया दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, मार्गदर्शक नाथ देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
✅ आजरा तालुक्याची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे:
तालुकाध्यक्ष: गुंडू मारुती परीट
तालुका उपाध्यक्ष: देविदास कृष्णा सूर्यवंशी, किरण केसरकर
तालुका सचिव: मंगेश परशराम पोतनीस
तालुका सहसचिव: विकास सुतार
तालुका कोषाध्यक्ष: सचिन इंदुलकर
तालुका मार्गदर्शक (निमंत्रित): नाथ देसाई
शहराध्यक्ष (आजरा): अभिषेक सदानंद रोडगी
शहर उपाध्यक्ष (आजरा): दीपक बल्लाळ
👩🦰 महिला आघाडी कार्यकारिणी:
तालुका महिला अध्यक्षा: राजश्री सावंत
तालुका महिला उपाध्यक्षा: गीता पोतदार, दिपाली सुतार
तालुका महिला सचिव: ज्योती पांडव
या नव्या कार्यकारिणीच्या नियुक्तीमुळे ग्राहक हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संघटनेला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा आहे. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



