Homeकला-क्रीडाAR Rahman लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स देत होते, तेव्हा पोलिस स्टेजवर पोहोचले आणि...

AR Rahman लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स देत होते, तेव्हा पोलिस स्टेजवर पोहोचले आणि ….

एआर रहमान स्टेजवर परफॉर्मन्स देत असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेव्हाच पोलीस येतात आणि ए आर रहमानच्या उपस्थितीत पोलीस कॉन्सर्ट थांबवतात. या दरम्यान, तो शांतपणे गाणे थांबवतो आणि स्टेजच्या मागे जातो.

पुणे : ऑस्कर विजेते गायक आणि संगीतकार ए आर रहमान यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी AR Rahmanने पुण्यात लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट केला, पण पुणे पोलिसांनी हस्तक्षेप करून संगीत मैफल थांबवली. मैफिलीची डेडलाईन संपल्यानंतर पोलिसांनी स्टेजवर चढून गायकाला गाण्यापासून रोखले. ए आर रहमानच्या या संगीत कार्यक्रमासाठी रात्री १० नंतर प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने ते थांबवले.

वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, एआर रहमानने 30 एप्रिल रोजी पुण्यातील राजा बहादूर मिल परिसरात लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केले होते. ए आर रहमानच्या या संगीत मैफिलीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. एआर रहमानने आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते, त्यावेळी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट मध्यंतरी थांबवली.

गायक स्टेजच्या मागे गेला

एक पोलीस अधिकारी स्टेजवर चढला आणि AR Rahmanचा हा कॉन्सर्ट थांबवण्याचा इशारा केला. नंतर कार्यक्रम थांबला आणि एआर रहमान पुन्हा स्टेजवर गेला.

पोलिसांनी हे निवेदन दिले

बंडगार्डन पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर संतोष पाटील म्हणाले- “रात्री 10 वाजेची डेडलाइन संपली असल्याने आम्ही त्यांना (एआर रहमान) आणि इतर कलाकारांना शो थांबवण्यास सांगितले. त्यांनी सूचनांचे पालन केले आणि शो थांबवला.” याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular