भादवण ( प्रमोद घाटगे ) – ता आजरा येथे शिवप्रतिष्ठान भादवणच्या वतीने गेली नऊ दिवस गावातील महिला, पुरुष, तरूण-तरूणीं शालेय विद्यार्थी -विद्यार्थीनीं सकाळी ५:३० वाजता विठ्ठल- रूक्मिणी मंदिर येथे जमा होऊन प्रत्येक वार्ड मधुन दुर्गामाता दौड काढत असे, दसऱ्याच्या दिवशी दुर्गामाता दौडची सांगता असल्याने गावातील तरुण -तरूणींनी गावभर रांगोळी काढली होती तसेच दौड मधील सहभागी महिला पुरुष तरूण-तरूणीं ,शालेय विद्यार्थी -विद्यार्थीनींना भगवे फेटे बांधले होते तसेच तरुणांना पांढरे शुभ्र सदरे तर महिला तरूणींनी साड्या परिधान केल्या होत्या सकाळी ६:०० वाजता विठ्ठल रूक्मिणी मंदिर भादवण येथुन दुर्गामाता दौडची सुरवात शिवकन्या कु.सानिका केसरकर हिच्या हस्ते झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे,शिवस्रोत,गाणी म्हणत तसेच लाठीकाठी, दांडपट्टा तलवार बाजी अशा धाडसी खेळाचे प्रात्यक्षिके झाली गावातील नागरिकांनी सदर दौडचे औक्षण करून भव्य असं स्वागत केले.
तसेच शिवकन्या कु.रूणाली पाटील या विद्यार्थ्यांनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी भाषण केल्यानंतर दुपारी १२ वाजता दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली यावेळी २४० जण धारकरी उपस्थित होते
मुख्यसंपादक