आजरा (अमित गुरव) -: आजरा येथे चोरीच्या उद्देशाने ATM मशीन फोडले असल्याची फिर्याद मल्लिकार्जुन मारुती निगनवर (वय ४७ ) राहणार मिनर्वा कॉलनी आजरा यांनी दिली.

कोणीतरी अज्ञात चोरट्याने काळ्या रंगाच्या चार चाकी गाडीतून येऊन बँक ऑफ महाराष्ट चे ATM मशीन गॅस कटर च्या साह्याने अर्धवट कट करून सेन्सर व सी. सी. टीव्ही सर्व्हेलर सिस्टमची तोडफोड करून अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान करून पैशाची चोरी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले. अशी प्रत्यक्ष फिर्याद दिली आहे.आजरा पोलिस स्टेशन चे अंमलदार वाय . जी. धोंडे अधिक तपास करत आहेत.
सध्या ATM चे दरवाजे , त्यामध्ये स्वच्छता दिसत नाही , त्याच प्रमाणे ATM मशीन बाहेर गार्ड असावेत अशी मागणी नागरिक करत आहेत ज्यामुळे असे प्रकार घडणार नाहीत.
चौकट – अलीकडे बहुतांश वेळा ATM मशीन मध्ये पैशांचा खडखडाट असतो. त्यामुळे सुरक्षा रक्षक (गार्ड ) ठेवणे ह्या बाबत बँक सकारात्मक भूमिका घेत नाहीत. असे एका बँक अधिकाऱ्याने जेष्ठ पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांना नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.


मुख्यसंपादक