Homeक्राईमपोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला ; या गुन्हेगारांना वरदहस्त असल्याचे आरोप ?

पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला ; या गुन्हेगारांना वरदहस्त असल्याचे आरोप ?

पुणे -: पुण्यात कोयता गँग ने दहशद निर्माण केली ती संपवण्याचा आटोकाट प्रयत्न पुणे पोलीस आयुक्त करत असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात सुद्धा मागे पुढे पाहिले जात नाही. तरीही त्यांच्या दहशती मद्ये वाठच होत आहे. यांची प्रचती म्हणून पोलीस अधिकाऱ्यावर कोयता उगारून त्यांनी दिली. वानवडी पोलीस स्टेशन च्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर हल्ला करण्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोयता गँग कडून रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे रत्नदीप गायकवाड असे हल्ला झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव असून ते वानवडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील दोन गुन्हेगारांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला .
डोक्यावर कोयता मारल्याने ते रक्तबंबाळ झाले त्यानंतर दोन्ही गुन्हेगारांनी तेथून पळ काढला. मात्र या घटनेनंतर पोलिसांचे भय राहिले नाही काय? असा प्रश्न पडतो. आणि या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी श्रेत्रात नेमके कोणाचे पाठबळ / वरदहस्त मिळते आणि का अशी कुजबूज परिसरात जोर धरत होती. तर राजकीय आसरा असल्यामुळेच या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात नसून त्यांना पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे आरोप दबक्या आवाजात होत आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular