आजरा(हसन तकीलदार )-आजऱ्यातील अंजुमन इत्तेहादुल इस्लाम ही चॅरिटेबल संस्था वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. हाजी आलम नाईकवाडे यांच्याकडे गटशिक्षण अधिकारी बसवराज गुजर यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने उर्दू हायस्कुल व अंजुमन यांचा कार्यभार सोपवला होता परंतु याविरोधत इनुस माणगावकर यांनी मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यानुसार खंडपिठाने पुढील 24/06/2025पर्यंतची तारीख देत पुढील तारखेपर्यंत चुकीच्या आदेशाच्या आधारे कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाऊ नये असा आदेश दिला असल्यामुळे या आदेशाची प्रत जोडून इनूस माणगावकर यांनी आजरा तहसीलदार, आजरा पोलीस, उपसंचालक जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी कोल्हापूर, मुख्याध्यापक उर्दू हायस्कुल आजरा तसेच गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, विरोधक कामकाज पाहत आहेत. त्यावर मुंबई हायकोर्ट खंडपीठ औरंगाबाद येथून त्याच्यावर स्थगिती आदेश आणला आहे.त्यानुसार सदर संस्थेतील पुढील कामकाज बंद करावे असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी इनूस माणगावकर म्हणाले की, स्कीम मंजुरी घेऊन जो कामकाज ताब्यात घेतला होता त्याला औरंगाबाद खंडपिठाने स्थगिती दिली आहे. 1937मध्ये रजिस्टर क्रमांक के. बी. 16ने चॅरिटेबल संस्था म्हणून ही संस्था नोंद आहे.शेवटी विजय हा सत्याचाच होईल याची मला खात्री आहे. यामुळे समाजाचे आणि संस्थेचे नुकसान होत आहे. योग्य निर्णय येईल आणि मला समाजाची सेवा करण्याची संधी मिळेल अशी मला आशा आहे.

यावेळी युनूस माणगावकर, मंजूर मुजावर, अहमदसाब मुराद, हुसेन दरवाजकर, इब्राहिम इंचनाळकर, महमद उर्फ एम डी दरवाजकर, सलाम काकतिकर, अबूसईद माणगावकर, अबू माणगावकर, जुबेर माणगावकर, अमजद माणगावकर, अनपाल तकीलदार, अमीनबाबा लमतुरे, ताहीर माणगावकर, अबू हुरेर माणगावकर, असिफ मुल्ला, शौकत लमतुरे, नासिर माणगावकर, गौस माणगावकर, सुफियान उर्फ गुड्डू खेडेकर, शादाब माणगावकर, आयुब मुल्ला, अमन फकीर, अकिब मुजावर, मतीन मुराद, सोहेल लतीफ, रिजवान माणगांवकर,इम्तियाज माणगावकर आदिजण उपस्थित होते.
वरील विषयाबाबत व दिलेल्या निवेदनाबाबत आलम नाईकवाडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, औरंगाबाद खंडपिठाने स्थगिती दिलेली नाही 1937मध्ये रजिस्टर क्रमांक के. बी. 16ने चॅरिटेबल संस्था म्हणून ही संस्था नोंद होती. विरोधक चॅरिटेबल संस्था म्हणून ही संस्था नोंद असल्याची दिशाभूल करीत आहेत पण ती पूर्वी होती आता नाही.
अशी कोणत्याही प्रकारची स्थगितीची नोटीस आम्हाला आलेली नाही. विरोधक अपप्रचार करीत आहेत. अंजुमन इत्तेहादुल इस्लाम आजरा ही संस्था कोल्हापूर धर्मादायकडे नसून आता वक्फबोर्ड महामंडळ संभाजीनगर येथे रजि. नं. MSBW /KPR/19/2008अशी नोंद आहे. माझी संचालक मंडळ स्कीम 28/12/2021ला झाली आहे. व वरील संस्थेत संचलित डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज आहे असे नाईकवाडे यांनी सांगितले


मुख्यसंपादक