आजरा(हसन तकीलदार) :-चंदगड तालुक्यातील 22 गावांमध्ये 1950 पूर्वीचे महसूलचे पुरावे न मिळाल्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यास स्थानिक लोकांना त्रास होत आहे. 1950 पूर्वीचे महसूलचे पुरावे कुरुंदवाड येथे होते आणि 2005 च्या पुरामध्ये ते वाहून गेले किंवा खराब झाले. वास्तविक पाहता या जुन्या कागदपत्रांची योग्य ती काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, परंतु सरकारने याकडे लक्ष न दिल्यामुळे हि सर्व जुने कागदपत्रे सोडून खराब झाले आणि आता मात्र सरकारी अधिकारी आम्हाला 1950 पूर्वीच्याच महसूल चे पुरावे हवे अन्यथा आम्ही तुम्हाला जात प्रमाणपत्र देणार नाही असे सांगत आहेत. निश्चितच हा तेथील स्थानिक लोकांवरती अन्याय आहे. सरकारने यावर काहीतरी तोडगा काढून ही अट शिथिल करावी यासाठी चंदगड येथील तहसीलदार कार्यालसमोर एकदिवशीय धरणे आंदोलन केले.तहसीलदार यांनी बैठकीचे आयोजन करून तोडगा काढू असे आश्वासन दिले.
ग्रामपंचायतींची स्थापना 1958 नंतरची आहे. तर ज्या गावांना ही समस्या आहे त्या गावातील नागरिकांना 1960 पूर्वीचे महसूलचे पुरावे मागण्यात यावेत किंवा या अटींमध्ये सवलत द्यावी जेणेकरून लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराचा उपभोग घेता येईल..
या विषयाच्या अनुषंगाने आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने चंदगड तहसीलच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन केले सदर आंदोलनाला लोकांची संख्या लक्षणीय होती.या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने प्रा. प्रकाश नाग यांनी केले.. व त्यांना तितक्याच ताकतीने अमित सुळेकर व विनायक खांडेकर यांनी साथ व सहयोग दिला. या आंदोलनाला जोतिबा सुतार, नितीन सुतार, राहुल मोरे, नितीन राऊत, शरद पाटील, आदि कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते..

या आंदोलनानंतर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिलेले आहे.जोपर्यंत योग्य निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन सुरु राहील असे डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक


