Homeघडामोडीगडहिंग्लजच्या लकी खिदमत फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर उत्सहात संपन्न

गडहिंग्लजच्या लकी खिदमत फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर उत्सहात संपन्न


गडहिंग्लज (हसन तकीलदार):-गडहिंग्लज येथे कार्यरत असणारे सामाजिक आणि विधायक कार्यात झोकून देणारे तसेच निःस्वार्थ आणि पारदर्शक कार्य करणारे लकी खिदमत फाउंडेशन यांच्यामार्फत वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्य रक्तदान श्रेष्ठदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद देत 48बॅग रक्त संकलन करण्यात आले.


समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूने लकी खिदमत फाउंडेशनचे निःस्वार्थ कार्य सुरु आहे.नेत्रतपासणी, रक्तदान, विद्यार्थी तसेच गरजूना मदतीचा हात अशा अनेक विधायक कार्यात आपली छाप सोडलेल्या लकी खिदमत फाउंडेशन तर्फे वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षीही याचप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात 48रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवीत रक्तदान केले. याप्रसंगी नियमित व सर्वात जास्त वेळा रक्तदान केलेले रक्तदाते उत्तम दळवी आणि नागेश होलसार यांचा सत्कार गडहिंग्लज नगरपालिका आरोग्य अधिकारी दस्तगीर पखाली व फाउंडेशनचे अध्यक्ष अमजद मीरा यांच्याहस्ते करण्यात आले. शिबीर पार पाडण्यासाठी लकी खिदमत फाउंडेशच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे गडहिंग्लज परिसरातील रुग्णांना तातडीच्या वेळी रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. समाजातील दानशूर वृत्ती आणि परस्पर सहाय्य भावना वृद्धिंगत करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम समाजाला आदर्श ठरतील आणि समाजाला दिशा देण्याचे काम करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

आजच follow करा आणि रहा अपडेट…

Whatsapp Chanel Link 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular