आजरा ( हसन तकीलदार ) :-जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय खो–खो स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून विविध शाळेच्या संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी व मुलींच्या संघानेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन केले व खो–खो या खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवला. या दोन्ही संघाची जिल्हास्तरीय खो–खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यक्ष हाजी आलम अहमद नाईकवाडे, सर्व संचालक मंडळ, प्र. मुख्याधपक सलीम शेख, सर्व वर्ग शिक्षक तसेच क्रीडाशिक्षक शेरखान पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक


