HomeबिझनेसCalculator मधील MS , MR , MC , M+ , M- ही...

Calculator मधील MS , MR , MC , M+ , M- ही बटणे काय व कशी काम करतात.

MS हे बटन हिशोब करताना तुम्हाला ज्या संख्येची वारंवार गरज असते ती संख्या दाबा त्यानंतर MS दाबा म्हणजे तो नंबर कॅल्क्युलेटर च्या मेमरीत आपोआप सेव्ह किंवा जतन केला जाईल त्यामुळे तुम्हाला तीच संख्या पुन्हा पुन्हा टाईप करावी लागत नाही. MS चा फुल्लफॉर्म मेमरी स्टोअर होय .

MR हे बटण दाबल्यास सेव्ह केलेली संख्या समाविष्ट होते. याचा फुल्लफॉर्म मेमरी रिकॉल असा होतो.

MC बटण दाबल्यास जतन असलेली संख्या मेमरी मधून काढून टाकण्यात येते त्यामुळे तुम्ही इतर कोणतेही संख्या पुन्हा एकदा जतन करण्यासाठी वापर करू शकता. MC चा फुल्लफॉर्म मेमरी क्लिअर असा होता.

M+ बटण्याच्या माध्यमातून MS द्वारे सेव्ह केलेल्या नंबरला दुसऱ्या संख्येत जोडता येते.

M- बटण दाबल्यास MS द्वारे सेव्ह केलेल्या नंबरला कोणत्याही संख्येतून कमी करण्यासाठी वापरतात.

C आणि CE याबद्द्ल बहुतेक लोकांना माहीत आहे कॅल्क्युलेटर मध्ये टाकलेली संख्या मिटवण्यासाठी याचा वावर होतो. परंतु दोन्ही मध्ये थोडा फरक आहे. हिशोबाच्यावेळी CE बटण दाबल्यास शेवटची संख्या काढली जाते, तर C बटणा मुळे स्क्रीनमधून संपूर्ण संख्या निघून जाऊन शून्य येतो.

तुम्हाला या बाबतीतील माहिती होती का हे आम्हाला नक्की कळवा ,तुम्हालाही असे कोणत्याही विषयावर आधारित अभ्यासपूर्ण लेख द्यायचे असतील तर आमच्या मेल वर स्वतःच्या नावासह पाठवा..

  • संकलन – लिंक मराठी टीम
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular