Homeघडामोडीचांदेवाडी कामवीर विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

चांदेवाडी कामवीर विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

आजरा (हसन तकीलदार) :
श्री.कामवीर विविध कार्यकारी विकास सेवा संस्था मर्यादित, चांदेवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी विठ्ठल-रुखमाई मंदिरातील अमृतराव देसाई सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभेच्या सुरुवातीला वार्षिक अहवाल कालावधीत निधन पावलेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर इयत्ता १०वी, १२वी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदनाचा ठराव लक्ष्मण सावंत यांनी मांडला. सचिव जयवंत येसादे यांनी मागील सभेचे इतिवृत्तांत आणि २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाचा ताळेबंद अहवालाचे वाचन केले.

सभेदरम्यान २०१७ पासूनचे थकीत सभासदावर कोणती कारवाई केली याबाबत सभासदांनी विचारणा केली. यावर चेअरमन राजू देसाई यांनी स्पष्टीकरण देत उत्तर दिले. तर व्हॉईस चेअरमन पांडुरंग सावरतकर यांनी संस्था पातळीवर सर्व कारवाई पूर्ण करून ती बँकेकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. तरीदेखील जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी अधिक प्रयत्न करण्यात येईल याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेकडे बँकेचे थकित कर्ज असल्याने सभासदांना लाभांश देण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या सभेला सर्व संचालक तसेच जेष्ठ सभासद बाबु भाऊ सावरतकर, जानबा गिलबिले, शामराव हसबे, केरबा हसबे, पांडुरंग जाधव व शंकर सावरतकर यांचे सह सभासद उपस्थित होते.
चहापानानंतर वार्षिक सभेची सांगता करण्यात आली.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

युट्युब लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=8CVnKR338XXteBA3

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular