शैलेश मगदूम -पुस्तकांची संगत हीच आयुष्यभराची शिदोरी असते. ती सातत्याने वृद्धींगत होत असते. आपल्याजवळील ज्ञानरूपी धन कोणालाही चोरता येत नाही. अवांतर वाचनाने स्वतःला समृद्ध बनवता येते त्याचबरोबर स्वतःची प्रतिष्ठाही वाढवता येते असे मत लेखक बा.स.जठार यांनी व्यक्त केले. ते वाचन प्रेरणा दिनानिमित्त दूधसाखर विद्यानिकेतन बिद्री (मौनीनगर) ता. कागल येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लेखक संग्रामसिंह मस्कर पारधेवाडी यांनी शाळेला आपली पुस्तके भेट दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य खांबे सर होते. सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केले तर आभार सावंत सरांनी मानले. यावेळी उपप्राचार्य गुरव सर, पर्यवेक्षक डी.टी.कांबळे, पाटील सर, खोत सर, जांभळे सर उपस्थित होते
मुख्यसंपादक