Homeघडामोडीआजऱ्यात वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी

आजऱ्यात वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी साजरी


आजरा (हसन तकीलदार ):-पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर गावात एका नाभिक कुटुंबात जन्मलेले व हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसणारे आणि जौहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शिवा काशीद यांची पुण्यतिथी आजऱ्यातील नाभिक समाजाच्या वतीने युवा नेते अनिकेत चराटी व विलास नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संतसेना महाराज नाभिक पत संस्था येथे साजरी करण्यात आली.


सर्व प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले आणि वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विलास नाईक यांनी वीर शिवा काशीद यांचा इतिहास मांडताना म्हणाले की, वीर शिवा काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. इतिहास शिवा काशिदांचे धाडस, बलिदान कदापिही विसरू शकणार नाही कारण शिवा काशीदसारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकारू शकले.


या कार्यक्रमाचे औचित्य साधत नाभिक समाजाचे युवा कार्यकर्ते हृषीकेश भोसले व युवा कार्यकर्त्यांनी श्रीराम रुग्णवाहीकेची सेवा सुरु केली आहे. या रुग्णवाहिकेचे उदघाट्नही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर बोलताना म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम खरोखरच अनोखा आहे. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णवाहीकेची सेवा सुरु केलेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. युवा नेते अनिकेत चराटी यांनी संत सेना महाराज पत संस्थेच्या वाढीसाठी व नाभिक समाजाच्या युवकांना मार्गदर्शन केले. तर आकाश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, युनोस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये शिवरायांचे 12किल्ले संवर्धनासाठी घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम अभिनंदनीय आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो. आणि त्यात पन्हाळगडाला प्राथमिकता देण्यात आली आहे ही बाब अभिमानास्पद आहे. याच पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांचा इतिहास आजरामर आहे.


कार्यक्रमाच्या शेवटी नाभिक संघटनेचे अध्यक्ष गौतम भोसले यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब पाचवडेकर, रामचंद्र शिंदे, अशोक पाचवडेकर, आनंदा इंगळे, दत्ता पोवार, रामा पाचवडेकर, संजय पाचवडेकर, संजय यादव, प्रकाश यादव, देव पाचवडेकर यांच्यासह आजरा तालुक्यातील नाभिक समाजाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular