Homeघडामोडीआजरा नगरपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन प्रक्रियेत दिरंगाई; अन्याय निवारण समितीची तहसीलदारांकडे तातडीची मागणी

आजरा नगरपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन प्रक्रियेत दिरंगाई; अन्याय निवारण समितीची तहसीलदारांकडे तातडीची मागणी

आजरा ( अमित गुरव ) -:
आजरा नगरपंचायत निवडणूक २०२५–२०२९ साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अधिकृत प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आज तहसीलदारांकडे लिखित निवेदन सादर केले.

ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे उमेदवार त्रस्त

समितीने दिलेल्या माहितीप्रमाणे—

नामनिर्देशनाच्या ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळाचा सर्व्हर मंदावणे,

डाऊनलोड व अपलोडचा वेग अत्यंत कमी असणे,

एका नामनिर्देशनासाठी अनावश्यक विलंब होणे

यामुळे उमेदवारांना मोठा विलंब होत आहे. दिवसभरात फक्त ३ ते ४ नामनिर्देशन पत्रेच स्वीकारली जात आहेत, अशी तक्रार समितीने नोंदवली आहे.

प्रक्रियेला गती देण्यासाठी समितीचा पर्यायी प्रस्ताव

अन्याय निवारण समितीने तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी पुढील पर्याय सुचवला आहे—

उमेदवारांनी ऑनलाइन फक्त नामनिर्देशनातील तपशील भरावेत.

मात्र संबंधित कागदपत्रे अपलोड न करता

नामनिर्देशनाचा प्रिंटआऊट (शपथपत्रासह) आणि आवश्यक कागदपत्रे संचाच्या स्वरूपात थेट कार्यालयात जमा करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.

समितीचे मत आहे की—

सर्व्हरवरील ताण कमी होईल,

उमेदवारांची प्रतिक्षा कमी होईल,

प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक बनेल.

समितीतील मान्यवरांच्या सह्या

या निवेदनावर पुढील सदस्यांच्या सह्या आहेत—
अध्यक्ष परशुराम बामणे, डॉ. श्रदानंद ठाकूर, प्रा. सुधीर मुंज, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, सुधीर कुंभार, मिनीन डिसोझा, मदन तानवडे, बंडोपंत चव्हाण.

✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!

📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular