अमित गुरव -: कोल्हापूर जिल्हयातील आजरा हा छोटासा तालुका. त्यात लोकसंख्येने मोठे असणारे आणि सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या भादवण गावचे रहिवासी विमानाने यात्रेसाठी आले.
कोल्हापूर जिल्हयातील हे पहिलेच प्रवासी आहेत ज्यांनी खास यात्रेसाठी विमान बुक केले . या प्रवासाची संकल्पना भादवण गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच मुंबई इंटरनॅशनल एअपोर्टवर वरिष्ठ अधिकारी आर. बी. पाटील आहेत . सर्वप्रथम विमान प्रवासाचा अनुभव घेतलेल्या लोकांचा प्रतिसाद आणि उत्साह आयोजक श्री. पाटील यांनी साकार केला. विमानतळावर सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी रहिवासी असलेल्या सर्वाचे स्वागत केले.

मुख्यसंपादक