आजरा (हसन तकीलदार):-आजरा ग्रामीण रुग्णालयात नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते डायलेसिस सेंटरचे उदघाट्न नुकताच झाले. यामुळे परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता खर्चिक प्रवासाशिवाय स्थानिक स्तरावरच ही उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री नाम. आबिटकर यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु केलेबद्दल आजरा अन्याय निवारण समितीतर्फे नाम. आबिटकर यांना आभार पत्र देऊन सत्कार करण्यात आला. आभार पत्रात म्हटले आहे की,ग्रामीण रुग्णालय आजरा येथे डायलिसिस सेंटर स्थापन केल्याबद्दल आभार
आपण ग्रामीण रुग्णालय , आजरा येथे डायलिसिस सेंटर उभारले ही अत्यंत स्तुत्य व जनहिताची बाब आहे. या केंद्रामुळे आजरा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता प्रवासाशिवाय स्थानिक स्तरावरच अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचा वेळ, पैसा व शारीरिक त्रास वाचणार आहे.

आपल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल व लोककल्याणाच्या सेवेसाठी घेतलेल्या या उपक्रमाबद्दल अन्याय निवारण समिती , आजरा आपला मनःपूर्वक आभारी आहे. आपण सदैव जनतेच्या आरोग्य व कल्याणासाठी असेच कार्य करत राहावे, हीच आम्हा सर्वांची अपेक्षा आहे.
आपल्या पुढील कार्यास अनेक शुभेच्छा!यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, नाथा देसाई, विजय थोरवत, जोतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, मिनिन डिसोझा, जावेद पठाण , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पिंपळे , आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुरव आदिजण उपस्थित होते.

मुख्यसंपादक